पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरप" /> पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत “सांगोला वृक्ष बँकेची” स्थापना
IMG-LOGO
Home सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत “सांगोला वृक्ष बँकेची” स्थापना
सामाजिक

पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत “सांगोला वृक्ष बँकेची” स्थापना

January 2021 473 Views 0 Comment
IMG

  पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत  “सांगोला वृक्ष बँकेची” स्थापना 

                                               

                         नगरपरिषद पातळीवरील महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

 
वृक्षांचे आपल्या जीवनात अनन्य् साधारण महत्व आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या‍ वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हवामान बदल व जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मींग) मुळे आज सर्व जीवसृष्टी  संकटात सापडलेली आहे. निसर्गाचा बिघडलेला हा समतोल सुधारण्याासाठी जगभर संघटित प्रयत्न  होणे गरजेचे आहे. यातील अनेक मार्गांपैकी वृक्षारोपण व संवर्धन हा निसर्ग संवर्धनाचा उत्तम मार्ग आहे. नेमकी हीच बाब ओळखून दुष्का‍ळी भागात मोडणा-या सांगोले नगरपरिषेने वसुंधरेच्या संरक्षणाकरीता “वृक्ष बँक” स्थाापनेचा अभिनव प्रयोग सुरु केला आहे. सदर वृक्ष बँकेची स्थांपना राज्यसशासनाच्या  ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत केली असल्याेची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
 
दिनांक 07 जानेवारी 2021 रोजी नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, नुतन आरोग्य सभापती रफिकभाई तांबोळी, पाणीपुरवठा सभापती सौ.शोभाताई घोंगडे, मुख्याधिकारी श्री,कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, पाणीपुरवठा अभियंता श्री.तुकाराम माने, अरोग्य निरीक्षक श्री.संजय दौंडे यांच्या, उपस्थितीमध्ये नगरपरिषद आवारात या वृक्ष बँकेच्या स्थापनेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला. शहरातील नागरिकांकडून झाडांची रोपे स्विकारून नगरपरिषदेमार्फत शहरात‍ विविध ठिकाणी त्यां्ची लागवड व जतन करून सांगोले शहरास स्वच्छ, सुंदर व हरित बनविणे हा या वृक्ष बँकेचा प्रमुख उद्देश आहे. नेहमीच्या बँकेत ज्याप्रमाणे आपण  पैश्यांच्या स्वरूपात ठेवी ठेवतो आणि काही वर्षांनी त्यापासून काहीतरी रिटर्न मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे या वृक्ष बँकेत प्रत्येकाने वृक्षांची रोपे आणि संरक्षण जाळ्या भेट देऊन ठेवीच्या स्वरूपात ठेवायची असून या रोपांना नगरपरिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणी लावून त्यांचे संवर्ध केले जाईल. दर 6 महिन्यांनी रोपांची होणारी वाढ छायाचित्रांसह संबंधित रोपांच्या ठेवीदारांना पाठवले जातील.काही वर्षांनी या वाढलेल्या वृक्षांपासून थंड सावली,ऑक्सिजन चा पुरवठा,जमिनीची धूप कमी होण्यास मदत,पाण्याची भूजल पातळी वाढण्यास मदत अश्या स्वरूपात रिटर्न्स मिळतील आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी फक्त ठेवीदारांनाच नाही तर शहरातील सर्व नागरिकांना व भावी पिढीनासुद्धा मिळतील.शहरातील नागरिकांनी, रोटरी क्लब, इनरव्हीबल क्लब, लायन्स क्लाब व शहरातील इतर सर्व सामाजिक संस्था, विविध उत्सव मंडळे, राजकीय पक्ष,कार्यकर्ते यांनी पर्यावरण पुरक देशी वृक्षांची रोपे व सरंक्षण जाळ्या मोठ्या प्रमाणात सांगोले नगरपरिषदेतील या वृक्ष बँकेस देवून सहकार्य करायचे आहे. या वृक्ष बँकेत प्राप्ती होणा-या सर्व रोपांची शहरात उपलब्धं होणा-या ठिकाणी लागवड करुन त्या्चे नगरपरिषदेमार्फत संवर्धन केले जाईल. वृक्ष बँकेस रोपे भेट देणा-या सर्व संस्था, नागरिक यांचे रेकॉर्ड जतन केले जाईल. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास रोपांच्या संरक्षणासाठी लावण्यात येणा-या संरक्षण जाळींवरती त्यांाची नावे लावण्यात येतील.
 सांगोला शहर व पर्यायाने तालुका हा दुष्कावळी भागात मोडत असून पाण्याची भूजल पातळी बरीच खोल आढळून येते. सबंध तालुक्या त पर्जन्याचे प्रमाण व वेळ यामध्येे कमालाची अनिश्चितता आढळून येते. सांगोला शहराचा विचार करता नवनवीन होणा-या बांधकामामुळे विकास होत असताना पर्यावरणाची हानी न होता शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या, लॉकडाउनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदुषणात मोठी घट झाली. पुर्वी चित्रकला स्पार्धेमध्ये अनेक मुले दोन डोंगराच्या मध्यभागी उगवणा-या सुर्याचे चित्र काढत असे. परंतु आज मुले हेच चित्र दोन इमारतीमधून उगवणा-या सुर्याचे काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून स्व च्छ हवा, नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपवणूक करण्यााची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे. यात आपला खारीचा वाटा उचलण्याच्या  हेतूने सांगोला नगरपरिषदेमार्फत या वृक्ष बँकेच्या‍ अभिनव प्रयोगाची सुरुवात केल्यााची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली. 
 
 
 
 राज्या शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत स्थापन करण्याात आलेल्या “वृक्ष बँकेमार्फत” येत्या काळात संपुर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. या अभिनव उपक्रमातून सांगोला शहरास पर्यावरण संवर्धनाची एक नवी दिशा मिळेल आणि या वृक्ष बँकेची स्था पना ही सांगोला शहरातील भावी पिढ्यांसाठी सांगोले नगरपरिषदेची एक अमुल्य भेट ठरेल.
           कैलास केंद्रे
 मुख्याधिकारी,नगरपरिषद सांगोला 
 
 
सांगोला शहरातील नागरिक, सामाजिक संस्था/मंडळे यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष बँकेस रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी व्हावी. नागरिकांनी आपला सहभाग फक्त रोपे भेट देण्यापुरता मर्यादित न ठेवता या वृक्ष बॅं‍केमार्फत शहरात विविध ठिकाणी लागवड केल्या जाणा-या रोपांच्या संवर्धनात महत्वाची भूमिका बजावून या अभिनव उपक्रमाचा मूळ उद्देश यशस्वी करण्यास हातभार लावावा. 
      *सौ.राणीताई माने*
नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद