न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला तालुकास्तरीय विज" />
सांगोला प्रतिनिधी
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 27 व 28 डिसेंबर 2024 रोजी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये उत्साहात पार पडले. यासाठी सांगोला तालुक्यातील माध्यमिक विभाग इयत्ता सहावी ते आठवी मधील 80 विद्यार्थ्यांनी तर व उच्च माध्यमिक विभाग इयत्ता नववी ते बारावी मधील 53 विद्यार्थ्यांनी तर शिक्षकांमधून सात शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
यामध्ये इयत्ता नववी ते बारावी गटामधून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा सुमित बंडू लवटे (इयत्ता बारावी शास्त्र ) याने LI - FI (लाय -फाय ) वर आधारित सादर केलेल्या आधुनिक पद्धतीच्या प्रतिकृतीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. तसेच इयत्ता सहावी ते आठवी या गटातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला च्या श्रीराज भंडारे याने तयार केलेल्या स्मार्ट हायवे विषयी तयार केलेल्या प्रतिकृतीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ गीता गुळमिरे मॅडम, प्रा हनुमंत श्रीराम, कुमारी पंचशीला सोनटक्के मॅडम, प्रा रोहित पिंजारी पाटील, प्रा देवेन लवटे यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, संस्था सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक मा. भाई चंद्रकांत देशमुख,उपाध्यक्ष श्री रामचंद्र खटकाळे सर, संस्था सचिव मा. विठ्ठल शिंदे सर, संस्था सदस्य श्री बबनराव जानकर, श्री अवधूत कुमठेकर मालक, प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा केशव माने, उपमुख्याध्यापक प्रा. संजय शिंगाडे, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, पर्यवेक्षक श्री तातोबा इमडे सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांवर व मार्गदर्शक शिक्षकांवर समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.