न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या मनोहर किसन लो" /> न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या मनोहर किसन लोखंडे ला नीट परीक्षेत 720 पैकी 636 गुण
IMG-LOGO
Home शैक्षणिक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या मनोहर किसन लोखंडे ला नीट परीक्षेत 720 पैकी 636 गुण
शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या मनोहर किसन लोखंडे ला नीट परीक्षेत 720 पैकी 636 गुण

June 2023 151 Views 0 Comment
IMG

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या मनोहर किसन लोखंडे ला नीट परीक्षेत 720 पैकी 636 गुण

सांगोला प्रतिनिधी                                                                इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज सांगोला चा विद्यार्थी मनोहर किसन लोखंडे याला नीट 2023 परीक्षेमध्ये 720 पैकी 636 गुण मिळाले, याबद्दल संस्था सदस्य प्रा. दीपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर,प्रा. डॉ. अशोक शिंदे व प्राचार्य लक्ष्मण गावडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला व भावी शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक प्रा. नामदेव कोळेकर, ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मनोहर किसन लोखंडे याला नीट 2023 परीक्षेमध्ये जीवशास्त्र विषयात 360 पैकी 350 गुण,रसायनशास्त्र विषयात 180 पैकी 145 गुण ,भौतिकशास्त्र विषयात 180 पैकी 141 गुण मिळवत नीट 2023 परीक्षेत एकूण 720 पैकी 636 गुण प्राप्त केले.यामुळे त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.