सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्ह" /> सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !
IMG-LOGO
Home खेळ सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !
खेळ

सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !

April 2026 6 Views 0 Comment
IMG

 सोशल मीडियावरही आयपीएलचा फिव्हर !                 

 श्याम ठाणेदार पुणे
 
 
   आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे  वर्ष आहे. सलग एकोणीस  वर्ष आपली  लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली अठरा वर्ष केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे  पाहिले जाते. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. मुळातच क्रिकेटला एका धर्माचे स्थान असलेल्या आपल्या देशात आयपीएल सुरू असल्याने  सहभागी संघाचे फॅन फॉलोअर्सची संख्या देखील खूप मोठी आहे. आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्या त्या संघाचे चाहते मैदानावर गर्दी करताना दिसतात. आयपीएलचा सामना कोणत्याही मैदानावर, कोणत्याही शहरांमध्ये असो क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे मैदाने तुडुंब भरली असल्याचे चित्र आपण दरवर्षीच पाहतो मात्र यावर्षी मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या आवडत्या संघाला  सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आजचे युग सोशल मीडियाचे युग आहे सोशल मीडियाचा वापर न करणारा क्रिकेट चाहता शोधूनही सापडणार नाही. आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाच्या दहा संघाचे स्वतंत्र सोशल मीडिया अकाउंट आहेत. प्रत्येक संघाला फेसबुक, इन्स्टाग्राम व  ट्विटरवर फॉलो करणारे करोडो फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स विविध सोशल मिडिया साइटवरून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत असतात. आयपीएलची मॅच चालू असताना ट्विट्स, पोस्ट, व्हिडिओज आणि मिम्सचा अक्षरशः पाऊस पडतो. सेकंदाला हजारो ट्विट्स, पोस्ट आणि व्हिडिओज  येत असतात. जो तो आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ट्विट आणि पोस्ट  करत असतात.  या सर्वांमध्ये मुंबई इंडियन्सचे फॅन फॉलोअर्स सर्वात जास्त आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम प्रमाणेच व्हाट्सएपवर  देखील चाहते आपल्या संघाला सपोर्ट करीत असतात. आपल्या आवडत्या संघाची मॅच असेल तर चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी व्हाट्सएपवर स्टेटस  ठेवतात. सध्या सोशल मीडियाचं चित्र पाहिलं तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग व आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन संघांना सोशल मीडियावर चाहत्यांचा सर्वात जास्त सपोर्ट मिळताना दिसत आहे. खेळाडूंमध्ये सर्वात जास्त सपोर्ट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली  याला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय टी  २० क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी विराटची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली आहे हे सोशल मीडियावरुन लक्षात येते. मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंग धोनी याला सोशल मीडियावरून सर्वाधिक सपोर्ट मिळाला होता. यावर्षी दुखापतीमुळे तो अद्याप एकही सामना खेळू शकला नाही पण तो जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा चाहतेही मीडियावर कल्ला करतील यात शंका नाही. विराट कोहली आणि धोनी सारखे जेष्ठ खेळाडूंनाच नाही तर नवख्या खेळाडूंनाही चाहते सपोर्ट करत आहेत. राजस्थान रॉयल्स संघाचा १५ वर्षीय  युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चांगलाच झोतात आला आहे. मैदानाप्रमाणेच तो सोशल मीडियावर देखील झोतात आहे. सोशल मीडियावरून त्याचे कौतुक करताना चाहते थकत नाही. हे झाले खेळाडूंबाबत. संघाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आरसबीच्या संघाला सर्वाधिक सपोर्ट मिळत आहे.  आरसीबीच्या सामन्याला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. टीव्ही असो की मोबाईल  सर्वाधिक पाहिले जाणारे सामने हे आरसीबीचेच असतात. आरसीबीप्रमाणे मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स,  पंजाब आणि हैद्राबाद या संघांच्या सामन्याला देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.  यावर्षीची आयपीएल कोणता संघ जिंकणार यावर  चाहत्यांमध्ये पैजा लागत आहेत . मॅच संपल्यानंतर मॅचवर आधारित तसेच प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या खिल्ली उडवणाऱ्या  मजेशीर मिम्स बनवून व्हायरल केल्या जात आहे. हे मिम्स बोलके  असतात. यातून करमणूक  तर होतेच पण संघाची सद्यस्थिती काय आहे हे देखील समजते. चेन्नई, मुंबई आणि कोलकाता हे संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत.   पाच वेळेचा विजेता मुंबई फक्त एक सामना जिंकू शकला  तर तीन वेळेचा विजेता कोलकाता अद्याप एकही सामना जिंकू शकला नाही. चेन्नईनेही पाच वेळा विजेतेपद मिळवले असले तर  त्यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही त्यामुळे या तीन संघाची आणि त्यांच्या खेळाडूंची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. चाहते सोशल मिडियावर मजेशीर मिम्स, मेसेज करत आपल्या संघाला सपोर्ट करतानाच प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवून   आयपीएलचा फिव्हर आणखी वाढवत आहे. एकूणच  केवळ  मैदानावरच नव्हे सोशल मीडियावर देखील आयपीएलचा फिव्हर वाढल्याचे  दिसत आहे.  
 
    
 

Copyright © All Rights are Reserved | Developed by stancecode.com