चिंचोली तलाव" /> चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघात महिंद्रा पिकअप- एस.टी. बस जोरदार धडक;चालकाचा जागीच मृत्यू
Home क्राईम चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघात महिंद्रा पिकअप- एस.टी. बस जोरदार धडक;चालकाचा जागीच मृत्यू
क्राईम

चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघात महिंद्रा पिकअप- एस.टी. बस जोरदार धडक;चालकाचा जागीच मृत्यू

May 2026 11 Views 0 Comment
IMG

चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघात महिंद्रा पिकअप- एस.टी. बस जोरदार धडक;चालकाचा जागीच मृत्यू 

 

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला-महुद मार्गावरील चिंचोली तलावाजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात भरधाव महिंद्रा पिकअपने एस.टी. बसला जोरदार धडक दिल्याने पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एस.टी. बसमधील महिला वाहकासह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. याबाबत बस चालक चैतन्य शिवाजी व्हरगर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मयत पिकअप चालक पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 28, रा. कडलास, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य शिवाजी व्हरगर (वय 35, रा. महीम, ता. सांगोला) हे शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास एस.टी. बस (क्रमांक MH 13 CU 8126) ही एसटी बस घेऊन सांगोल्यावरून पुण्याकडे जात होते. त्यावेळी चिंचोली तलावाजवळ इंगोले यांच्या घरासमोर समोरून येणारी महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 14 FT 1002) भरधाव वेगात येऊन एस.टी.वर आदळली.अपघात इतका भीषण होता की, या अपघातात पिकअप चालक पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 28, रा. कडलास, ता. सांगोला) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हलविण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एस.टी. बसमधील महिला वाहक श्रीमती श्रद्धा पोरे, प्रवाशी अश्विनी इंगोले यांच्यासह इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास पोहेकॉ बनसोडे करीत आहेत.