हतीद येथे दारूच्या अड्ड्यावर सांगोला पोलिसांचा छापा;२५०००/ रुपयाचा मुद्देमाल जप्त
सांगोला (तालुका प्रतिनिधी): हातीद ता.सांगोला येथील शिंदे वस्तीजवळ चिलारीच्या झुडपामध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २२ हजार ६०० रुपयांची ११३० लिटर गूळमिश्रित रसायन, १८०० रुपयांची ३० लिटर तयार हातभट्टीची दार, युरिया, नवसागर असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक राहुल कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम शामराव चव्हाण रा.हातीद ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत हुले, पोलीस नाईक राहुल कोरे, पोहे कॉ काझी, चापोक लोंढे असे कोळा दुरक्षेत्रमध्ये सरकारी वाहनातून पेट्रोलींग करीत असताना हातीद येथील शिंदे वस्तीजवळ सरकारी ओठ्यालगत चिलारीच्या झुडपामध्ये उत्तम शामराव चव्हाण रा.हातीद चोरुन हातभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता उत्तम शामराव चव्हाण रा.हातीद हा हातभट्टी काढत असलेला दिसुन आला. पोलिसांना पाहताच उत्तम चव्हाण हा पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी २२ हजार ६०० रुपये किमतीचे ११३० लिटर गुळमिश्रीत रसायन, १ हजार ८०० रुपये किमतीची 30 लिटर तयार हातभट्टी दारु, युरीया, नवसागर कांड्या असा एकूण 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत पोलीस नाईक राहुल कोरे यांनी उत्तम शामराव चव्हाण रा.हातीद ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.