अबब.....चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले!!

सांगो" /> अबब.....चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले!!

IMG-LOGO
Home क्राईम अबब.....चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले!!
क्राईम

अबब.....चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले!!

November 2023 457 Views 0 Comment
IMG

अबब.....चोरट्यांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले!!

सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने जवळा (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील 29 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना 24 नोव्हेंबर सायंकाळी साडेचार ते 25 नोव्हेंबर सकाळी सव्वा आठच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

     जवळा येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय एकनाथ रसाळ (रा. कडलास, ता. सांगोला, सध्या जवळा व तरंगेवाडी ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 24 नोव्हेंबर रोजी दत्तात्रय रसाळ हे सकाळी पावणेदहाच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामकाज करून पुन्हा साडेचार वाजता कार्यालय बंद करून गावी गेले होते. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांना फोन आला. अज्ञात चोरट्याने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून ग्रामपंचायत कार्यालयातील लाकडी टेबल, एक गोलाकार खुर्ची, सीसीटीव्हीचा डीव्हीआर असे एकूण 29 हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार ग्रामसेवक दत्तात्रय रसाळ यांनी सांगोला पोलीसात दिली आहे.