फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणि" /> फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर- मंत्री जयकुमार गोरे
IMG-LOGO
Home शैक्षणिक फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर- मंत्री जयकुमार गोरे
शैक्षणिक

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर- मंत्री जयकुमार गोरे

June 2026 95 Views 0 Comment
IMG

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर- मंत्री जयकुमार गोरे

 
सांगोला : प्रतिनिधी
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे. फॅबटेकच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे सांगोल्याच्या वैभवात मोठी भर पडली असून संस्थेचे कार्य अनुकरणीय असल्याचे मत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरे फॅबटेक टेक्निकल कॅम्पस भेटी दरम्यान व्यक्त केले.
   पुढे बोलताना ते म्हणाले, फॅबटेक ही केवळ शैक्षणिक संस्था नसून ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे केंद्र आहे. आधुनिक शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. फॅबटेक मधून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवत असून संस्थेने शिक्षणाच्या बळावर सांगोल्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उत्कृष्ट निकाल यामुळे फॅबटेक आज ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील आदर्श ठरत असल्याचे मत मंञी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
    मंञी जयकुमार गोरे यांनी फॅबटेक मधील फार्मसी, इंजिनिअरिंग, पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील विविध विभागाला तसेच ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली.
  या दरम्यान फॅबटेक संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डाॅ. अमित रूपनर, दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्य डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, पॉलिटेक्निक चे प्राचार्य डाॅ. तानाजी बुरूंगले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
फोटो ओळी: सांगोला फॅबटेक टेक्निकल कॅम्पस पाहणी करताना  पालकमंत्री जयकुमार गोरे  सोबत संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर व इतर