जाधव वस्ती (धर्मपुरी) येथे बालचमुचा भरला बाल आनंद मेळावा<" /> जाधव वस्ती (धर्मपुरी) येथे बालचमुचा भरला बाल आनंद मेळावा
IMG-LOGO
Home शैक्षणिक जाधव वस्ती (धर्मपुरी) येथे बालचमुचा भरला बाल आनंद मेळावा
शैक्षणिक

जाधव वस्ती (धर्मपुरी) येथे बालचमुचा भरला बाल आनंद मेळावा

January 2026 77 Views 0 Comment
IMG

जाधव वस्ती (धर्मपुरी) येथे बालचमुचा भरला बाल आनंद मेळावा

नातेपुते प्रतिनिधी -

 

जि.प.प्रा. शाळा जाधववस्ती (धर्मपूरी) येथे दि-१२/०१/२०२६ वार - सोमवार रोजी  'बाल आनंद मेळावा' (बाजार) आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्री. विलास गुलाबराव जाधव, तसेच जि.परिषद धर्मपुरी च्या केंद्रीय मुख्याध्यापक सौ.संजीवनी निगडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.निलेश निगडे, उपाध्यक्ष सौ.अमृता कुलाळ,सदस्य श्री.कृष्णाथ मोरे तसेच सर्व सदस्य यांच्या उपस्थित मध्ये संपन्न झाला. या बाल आनंद मेळाव्यासाठी सर्व पालकांनी अतिशय आनंदाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी श्री. रविराज बोत्रे, पवन शेडगे, शिवम निगडे,इ.  व्यक्तींनी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले.

अतिशय आनंदी, उत्साही वातावरणात बाल आनंद मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्रा.शाळा , जाधववस्तीचे मुख्याध्यापक वायसे सर,निगडे सर आणि केंजळे मॅडम यांनी योग्य रित्या करून कार्यक्रम आनंदात आणि बाल चमुच्या उत्साहात पार पाडला.