शिवाजी पॉलिटेक्निक कॉले" /> शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न.
IMG-LOGO
Home शैक्षणिक शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न.
शैक्षणिक

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

October 2025 197 Views 0 Comment
IMG

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

 
सांगोला :-  शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत विद्यार्थी-विद्यार्थिनीं सोबत थेट संवाद साधला. या भेटीचा उद्देश विद्यार्थिनीं मध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देणे आणि सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक उपाय योजना समजावून सांगणे हा होता. 
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला निर्भया पथकाच्या अधिकारी व सदस्य यांना प्राचार्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य यांनी त्यांच्या प्रस्तावने मध्ये निर्भया पथकाच्या कार्याचे कौतुक करत असे उपक्रम शिक्षण संस्थांमध्ये नियमित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. 
          या कार्यक्रमात निर्भया पथकाच्या प्रमुख महिला अधिकारी पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थिनींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये विद्यार्थिनींना आपात्कालीन प्रसंगी कशी प्रतिक्रिया द्यावी, कोणते हेल्पलाईन क्रमांक आठवून ठेवावे, मोबाईलमध्ये 'निर्भया' अथवा इतर सुरक्षा ॲप्स कसे वापरावेत यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश होता. तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा व कॉलेज जीवनामध्ये तरुण-तरुणींनी तारुण्य अवस्थे मध्ये कसे वागावे याबद्दल विद्याथ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आत्मसंरक्षणाचे काही प्राथमिक धडेही दिले, जेणेकरून कठीण परिस्थितीत विद्यार्थिनींना स्वतःचा बचाव करू शकतील. याचबरोबर विद्यार्थ्यांनी करियर, अवांतर वाचन, स्पर्धा परीक्षा यावर लक्ष देऊन सोशल मीडियाचा वापर कमीत कमी वापर करावा असेही आव्हान केले.
          विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना निर्भया पथकाचे सदस्य पोलिस कॉन्स्टेबल अमोल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना विविध आपत्कालीन क्रमांक, कायदेशीर हक्क आणि कॉलेज मधील तक्रार पेटीचा वापर कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी ११२ हा आपत्कालीन नंबर वापरण्याचे महत्व, पोलिसांच्या मदतीसाठी कसे संपर्क साधावा, तसेच पोक्सो कायद्याची माहिती,लायसन नसणे, हेल्मेट न वापरणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे इ. बद्दलचे दंड या विषयी माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीचा किंवा धोक्याचा सामना कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले.  संस्थाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.