शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे फार्मसी महाविद्यालय मिरज " /> शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे फार्मसी महाविद्यालय मिरज वार्षिक स्नेहासंमेलन उत्साहत संपन्न
IMG-LOGO
Home संस्कृती शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे फार्मसी महाविद्यालय मिरज वार्षिक स्नेहासंमेलन उत्साहत संपन्न
संस्कृती

शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे फार्मसी महाविद्यालय मिरज वार्षिक स्नेहासंमेलन उत्साहत संपन्न

February 2025 160 Views 0 Comment
IMG

शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे फार्मसी महाविद्यालय मिरज वार्षिक स्नेहासंमेलन उत्साहत संपन्न

 

सांगोला प्रतिनिधी 

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अनुदानित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी शिक्षण महर्षी डॉ बापूसाहेब साळुंखे महाविद्यालय मिरज यांचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 वार्षिक स्नेहासंमेलन उत्साहत पार पडले 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे माझी विद्यार्थी व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे, सांगोला चे प्राध्यापक डॉ. भारत भाऊसाहेब गरंडे व इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी प्राचार्य जे. जे . बेलशर सर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून झाली.

प्रमुख पाहुणे डॉ. भारत गरंडे यांनी फार्मा क्षेत्रातील कररियर व महाविद्यालयाचा इतिहास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले 

या वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्थि पत्रक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे भाग घेऊन विविध कला गुणांचे प्रदर्शन करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमास इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य जे. जे . बेलशर सर प्रा. सौ. वैष्णवी लेले, प्रा. तुषार पाटील प्रा. सौ. उजमा मुत्तवली प्रा. ऋतुजा नमदे कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय ओक भंडारपाल सौ. सरिता पाटील लॅब टेक्निशिन शक्ती धनसरे लेखापाल रवी बनसोडे, दिगंबर जगताप, विनोद कांबळे इ. स्टाफ, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.