वक्तृत्व कलेसाठी वाचन व चिंतनाची नितांत गरज- मा- सुरेश पवार गुर" /> गुरुवर्य बापूसाहेब झपके ४० स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
IMG-LOGO
Home संस्कृती गुरुवर्य बापूसाहेब झपके ४० स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
संस्कृती

गुरुवर्य बापूसाहेब झपके ४० स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

September 2021 295 Views 0 Comment
IMG

वक्तृत्व कलेसाठी वाचन व चिंतनाची नितांत गरज- मा- सुरेश पवार गुरुजी

गुरुवर्य बापूसाहेब झपके ४० स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी)आपल्या जीवनामध्ये वक्तृत्वकला ही खूप महत्त्वाची आहे.या कलेसाठी एक प्रकारची साधना करावी लागते.या साधनेतून निर्माण झालेली उत्तम कला ही आपल्या आयुष्याला उभारी देत असते.वक्तृत्व कलेच्या माध्यमातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. चिंतन आणि मनन यांच्या समन्वयातून उत्कृष्ट विषय मांडणी हीच हाच वक्तृत्व कलेचा सर्वात मोठा अशय आहे. वक्तृत्व कला जोपासण्यासाठी वाचन व समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे.  सक्षमपणे आपण आपली मांडणी करू शकतो म्हणूनच वक्तृत्व कलेसाठी वाचन व  चिंतन यांची नितांत गरज  असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सुरेश पवार यांनी केले गुरुवर्य बापूसाहेब झपके ४० स्मृती समारोह जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी परीक्षक प्रसिद्ध वक्ते प्रा. तुकाराम मस्के ,सोमनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

    सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,थोर स्वातंत्र्यसेनानी,शिक्षण महर्षी कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या ४० व्या स्मृतीसमारोहानिमित्त बुधवार दि.१५ सप्टेंबर २०२१ रोजी इ.५वी ते ७वी गट  तालुकास्तरीय  व इ.८ वी ते १०वी गट,इ.११वी ते १२ वी गटासाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे उत्साहात संपन्न झाल्या.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास   परीक्षक,स्पर्धक विद्यार्थी व पालक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव म.शं.घोंगडे, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

या स्पर्धेत इयत्ता५ ते ७ गट तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी बाबर वैष्णवी शहाजी( नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा) द्वितीय क्रमांक कुमार पांढरे रोहन पांडुरंग (नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा) तृतीय क्रमांक कुमारी पवार प्रणिती राजेंद्र (पायोनिअर इंग्लिश मेडिअम मंगेवाडी) चतुर्थ क्रमांक फक्त मुलींसाठी कुमारी वाघमोडे सारंगी वसंत (सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला) पाचवा  क्रमांक फक्त ग्रामीण भागातील स्पर्धकासाठी कुमारी भोसले साक्षी जालिंदर (छत्रपती शिवाजी विद्यालय धायटी )हिने पटकाविले

 

इयत्ता ८ ते १० वी गट जिल्ह्यास्तरीय  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी पाटील मैथिली ऋषिकेश (सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला ) द्वितीय क्रमांक कुमार  माने साक्षी लक्ष्मण ( सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला) तृतीय क्रमांक कुमार इरकल ईशान दीपक द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर ) चतुर्थ क्रमांक फक्त मुलींसाठी कुमारी अलदर पूनम बाबासो (कोळा विद्यामंदिर हायस्कूल कोळा)पाचवा  क्रमांक फक्त सांगोला तालुका  स्पर्धकासाठी कुमारी कुमारी कांबळे आयुष बिरा (छत्रपती शिवाजी विद्यालय धायटी )हिने पटकाविला.इयत्ता ११वी १२ वी गट जिल्ह्यास्तरीय  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी बंडगर सोनाली निवृत्ती (सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला) द्वितीय क्रमांक कुमार  उदयनराजे शशांक भोसले( श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा )तृतीय क्रमांक  कुमारी सरगर वैष्णवी भीमराव (नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज नाझरा)चतुर्थ क्रमांक फक्त मुलींसाठी कुमारी कुमारी बाबर रेवती संग्राम (नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज नाझरा) 

 

पाचवा  क्रमांक फक्त सांगोला तालुका  स्पर्धकासाठी कुमारी  आलदर नम्रता अशोक( कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा) हिने पटकाविले.

 

 वरील तिन्ही गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना  परीक्षक यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण कार्यक्रमांमध्ये  प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं  घोंगडे,प्राचार्य भीमाशंकर पैलवान, प्राचार्य नारायण विसापूरे,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे ,पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभीषण माने, पोपट केदार उपस्थित होते..

 

   परीक्षक म्हणून सुरेश पवार, प्रा.तुकाराम मस्के,उमेश महाजन, सोमनाथ गायकवाड,सौ.मैत्रेयी केसकर, रमाकांत अयाचित, सूर्याजी भोसले , युवराज भोसले,सागर विश्वासे यांनी काम पाहिले सर्व परीक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

 सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी  सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा कोड क्रमांक पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना अल्पोपहार व परगावच्या स्पर्धकांना एकेरी प्रवासखर्च आयोजकांकडून देण्यात आला.

 

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वांड.मय मंडळ,उत्सव विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास  प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धा गटानूसार तीन ठिकाणी कोवीड -१९ शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले .सूत्रसंचालन प्रा.शिवशंकर तटाळे व असुतोष नष्टे  यांनी केले तर आभार प्रदर्शन उन्मेष आटपाडीकर यांनी मानले