अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू

 

" /> अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागिच मृत्यू
IMG-LOGO
Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागिच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागिच मृत्यू

June 2025 672 Views 0 Comment
IMG

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू

 

सांगोला प्रतिनिधी 

भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास रत्नागिरी ते नागपूर जाणाऱ्या महामार्गावरील सांगोला बायपास महूद उड्डाणपुलाच्या नजीक घडली. स्वप्नील बबन काळुंगे-३६ रा. कचरेवाडी ता मंगळवेढा जि. सोलापूर असे मृताचे नाव आहे.

याबाबत, पोलीस हवालदार घोंगडे यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मृत स्वप्निल काळुंगे हा कचरेवाडी येथून शुक्रवारी रात्री दुचाकी वरुन मंगळवेढा ते सांगोला महामार्गावरून चिंचोली बायपास आला होता. रस्ता चुकल्याने त्याने महूद उड्डाणपुलाच्या खाली दुचाकी लावून रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलावरून पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने स्वप्निल काळुंगे यास जोराची धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. वैभव जांगळे यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस हवालदार घोंगडे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. अंगावरील कपडे इतर माहितीच्या आधारे ओळख पटवून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.