श्री गणेश विद्यालय लातूर शाळेच्या बसचा भीषण अपघात;बारा विद्या" />
सांगोला प्रतिनिधी
श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर माध्यमिक विद्यालयाची शाळेची खाजगी बस कोल्हापूर पर्यटनाला जात असताना पहाटे 3.30 च्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खाजगी बसचा अपघात झाला. बस रस्त्याच्या खाली उतरली ,दोन वेळा पलटी मारून रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली सदर घटनेमध्ये बारा विद्यार्थी व चार शिक्षक जखमी झाले असून जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारा साठी दखल करण्यात आले.
श्री गणेश विद्यालय शिवनखेड लातूर या विद्यालयाची माध्यमिक शाळेची सहल लातूर येथील खाजगी बस एम एच 24 ए बी 7281 ही 39 विद्यार्थी व आठ शिक्षक यांना घेऊन रात्री दहा वाजता कोल्हापूर कडे निघाली होती.सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या आनंदामध्ये कोल्हापूरकडे निघाले असताना मंगळवेढा येथील लक्ष्मी मंदिर काळाखडक च्या जवळ ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा पलटी झाली. यामध्ये साखर झोपेमध्ये असणारे विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली असून 108 ॲम्बुलन्स मंगळवेढा डॉ. प्रज्योत पाटील व पायलट गौसपाक आतार यांनी तातडीची मदत कार्य केले. 108 ॲम्बुलन्स सांगोला यांनाही जखमींची संख्या जास्त असल्यामुळे मदतीसाठी बोलवण्यात आले होते त्यामध्ये डॉ.वैभव जांगळे व पायलट दत्ता भोसले त्याचबरोबर हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची ॲम्बुलन्स 1033 चे ड्रायव्हर व सुपरवायझर यांनी तातडीची घटनास्थळ गाठून मदत कार्य करून जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थी व शिक्षक यांची यांना कोणती गंभीर दुखापत नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय मध्ये नाईट शिफ्ट आर.बी.एस.के चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण माने, आयुष डॉ. निखिल जोशी , आर.बी.एस.के चे डॉ कुलकर्णी व परिचारिका वैशाली शिंदे, शितल कपाटे, सानिका गायकवाड सुनिता जाधव व चनशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेची माहिती मिळतात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर यांनी तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.