राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साज" /> राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी
IMG-LOGO
Home संस्कृती राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी
संस्कृती

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी

February 2025 81 Views 0 Comment
IMG

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी 

सांगोला प्रतिनिधी )- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती परीट गल्ली येथे रविवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

     जयंतीनिमित्त  स्वच्छता मोहीम, शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण,  ह भ. प. संस्कार महाराज खंडागळे, संगेवाडी यांचे कीर्तन झाल्यानंतर १२. ३० वाजता गाडगेबाबा यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

जयंती निमित्त आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आ. दीपकआबा साळुंखे पाटील, बाबुराव गायकवाड, तानाजीकाका पाटील, सागर पाटील, बापूसाहेब भाकरे, दादासाहेब लवटे, पत्रकार सतीश सावंत, राजेंद्र पाटील, महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू ननवरे सोलापूर जिल्हा परीट समाज सेवा मंडळाचे सचिव दत्तात्रय क्षीरसागर, अरविंद केदार, बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, मैनाताई बनसोडे, चंदन होनराव, अरुण बिले, अरुण काळे, समीर पाटील, अच्युत फुले, विजय बनसोडे, पत्रकार रवींद्र कांबळे, ऍड. महादेव कांबळे, अमजद बागवान, तुषार इंगळे, विष्णुपंत केदार, सौदागर केदार, वसंत सुपेकर, योगेश साळुंखे, प्रवीण ढोले, आलिम आतार आदींनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सायंकाळी श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन झाले. जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी परीट समाज सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या जयंती उत्सवास शहर व तालुक्यातील समाबांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.