गौरी -गणपती सजावट स्पर्धेमुळे अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाल" /> राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
IMG-LOGO
Home सखी सहेली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
सखी सहेली

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

September 2021 560 Views 0 Comment
IMG

गौरी -गणपती सजावट स्पर्धेमुळे अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले : सुनंदाताई पवार

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

सांगोला/प्रतिनिधी :

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचे सर्व पदाधिकारी व सुचिताताईंची संकल्पना आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी दिलेली साथ ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले आहे. असे सांगत, प्रत्येक मातापित्यांनी मुलीला सक्षम बनवा, त्यापुढे जाऊन तिच्या प्रत्येक कार्यामध्ये माहेर आणी सासरकडून तिचे कौतुक करा, आज मुली आणि महिलांना कुटुंबातून प्रतिसाद मिळाला तर निश्चितच यश संपादन करतील, यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी इतरांकडून मीळणारा मान-अपमान यापलीकडे जाऊन प्रामुख्याने महिलांनी सर्वप्रथम स्वतःचा सन्मान करावा असे प्रतिपादन सुनंदाताई पवार यांनी केले.

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी सांगोला तालुका आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुनंदाताई पवार, सविताताई व्होरा, मधुमतीताई साळुंखे पाटील, डॉ. नेहाताई साळुंखे पाटील सुचिताकाकी मस्के व शोभाताई खटकाळे, सखुताई वाघमारे, शुभांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंगळवार दि. 28 रोजी हॉटेल जोतिर्लींग येथे संपन्न झाला. यावेळी सुनंदाताई पवार बोलत होत्या. दरम्यान स्पर्धेत विजय मिळवलेल्या शिवानी कांबळे प्रथम क्रमांक मिळविला त्यांना बक्षीस म्हणून 9601 रुपये व सुप्रियाताई चषक,शाल,श्रीफळ व फेटा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. द्वितीय क्रमांक रत्नप्रभा माळी यांना मिळाला त्यांना 7601 रुपये बक्षीस व चषक, शाल,श्रीफळ व फेटा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तृतीय बक्षीस पूजा भागवत यांना 5601 रुपये व चषक, शाल,श्रीफळ व फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. तर चतुर्थ क्रमांक सुवर्णा इंगवले व मीना मस्के यांना 3 हजार 601 रुपये व चषक,शाल,श्रीफळ व फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. यासह गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस सुचिताकाकी मस्के यांच्या वतीने माहेरची साडी देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

पुढे बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या, अनेक महिलांना ताण तणाव कुटुंबातील वाद विवाद यासारख्या घटनांना सामोरे जावे लागते. मानसिक ताण आणि तणावमुक्त जीवन सुरू झाल्यानंतर आजार बळावतात, दरम्यान महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी आणि काळजी करताना स्वतःचाही आरोग्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानिमीत्ताने कुटुंबामध्ये मनमोकळेपणाने चर्चा करा अनेक प्रश्न मार्गी लागतील. महिलांनी कुटुंबातील कोणाचा तरी हात घट्ट धरून समाजामध्ये वावरायला जगायला शिकलं पाहिजे. असे सांगत, आज महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचे सर्व पदाधिकारी व सुचिताताईंची संकल्पना आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी दिलेली साथ ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने अनेक महिलांना प्रोत्साहन मिळाले आहे. अशाच पद्धतीचा उपक्रम कर्जत-जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत. या सारख्या कार्यक्रमातून महिलांना व्यासपीठ निर्माण होते. आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली जाते. आणखी थाप टाकण्याचे काम येथील आयोजकांनी केले असल्याचे सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी सांगितले.

यावेळी डॉ. नेहाताई साळुंखे पाटील म्हणाल्या माझ्या हातून कोणाचतरी चांगलं व्हावं अशी अपेक्षा असते, आणी माझ्या दिवसाची सुरुवात अनेकांना आजारमुक्त आणी वेदना मुक्त करण्यापासुन हॉस्पिटलमधून होते.असे सांगत, पुरुषप्रधान देशामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल हीच संकल्पना होती. पण आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. त्यामुळे महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे व स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना सविताताई व्होरा म्हणाल्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज संपन्न होतोय हा सर्व महिलांसाठी आनंदाचा दिवस आहे. सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या 10 हजार मुली सोबत काम करत आहेत. तसेच शारदा अकॅडमीच्या माध्यमातून 800 ते 900 महिला पोलिस ट्रेनिंग घेत आहेत. पवार मॅडम चे काम कौतुकास्पद आहे महिलांचा सन्मान वाढणार आहे. असे सांगत, गर्भातील लेख वाचली नाही तर जगली पाहिजे व सक्षम बनली पाहिजे. व नंतर शिकून ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. व पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रांमध्ये कार्यरत झाली पाहिजे. व मिळालेल्या प्रत्येक पदाचा सन्मान स्त्रीने करायला शिकले पाहिजे. भारत हा पुरुष प्रधान देश जरी असला तरी मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करू नका, जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. मुलगा भारत देश असेल तर मुलगी ही भारत माता आहे. त्यामुळे मुलगा आणि मुलींमध्ये भेदभाव करू नका, महिलांना सन्मान द्या असेही सविताताई व्होरा यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.