महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फ" /> महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस
IMG-LOGO
Home सखी सहेली महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस
सखी सहेली

महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

February 2021 817 Views 0 Comment
IMG

महिलांच्या विकासात समाजाची भूमिका महत्त्वाची : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

 
'आम्ही सावित्रीच्या लेकी' या ग्रंथाचे प्रकाशन; थिंक टँक पब्लिकेशनचा पुढाकार
 
"आम्ही सावित्रीच्या लेकी" या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
 
सांगोला /नाना हालंगडे
महिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. महिला ह्या जन्मत:च सबला आहेत. मात्र, आजही महिलांचे वेगवेगळ्या माध्यमांतून खच्चीकरण होताना दिसते. हे थांबायला हवे. महिलांच्या विकासात समाजाचीही भूमिका महत्त्वाची असून समाजाकडून याअनुषंगाने कृती झाली तर महिलांचा सर्वांगिण विकास व्हायला वेळ लागणार नाही,  असा विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला. 
थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित व सुनिता अरुण गायकवाड संपादित "आम्ही सावित्रीच्या लेकी" या ग्रंथाचे प्रकाशन कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून वालचंद महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा वाघमारे उपस्थित होत्या. प्रास्ताविक संपादिका सुनिता गायकवाड यांनी केले. डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका विशद केली. 
पुढे बोलताना कुलगुरु डॉ. फडणवीस म्हणाल्या की,  आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांच्या विकासाबाबत,  प्रबोधनाबाबत सातत्याने कार्य करीत असतो. "आम्ही सावित्रीच्या लेकी" या ग्रंथाचे एेतिहासिक संदर्भमूल्य मोठे आहे. महिलांची जडणघडण खूप कष्टदायी असते. त्यांची संघर्षमय वाटचाल ग्रंथ स्वरुपात प्रसिद्ध होणे महत्त्वाचे असते. ते कार्य या ग्रंथातून झाले आहे. महिलांचे हे अनुभव बँक डिपॉझिटसारखे असतात. हे अनुभव पुढे येण्याचे प्रमाण सतत वाढत व जमा होत राहिले पाहिजे. लेखनातून महिलांना बळ मिळत राहते. याकामी स्वयंप्रेरणा कामी येईल. महिलांचा सर्वांगिण व्हावा,  ही भूमिका वाढीस लागली पाहिजे. 
प्रमुख पाहुण्या निशा वाघमारे म्हणाल्या की,  महिला या निसर्गत:च कणखर असतात. आजवर अनेक शेतकरी पुरुषांनी आत्महत्या केल्या. मात्र शेतकरी महिलांनी आत्महत्या केल्याचे एेकिवात नाही. कोणतीही गोष्ट करताना महिला कुटुंबाचा,  समाजाचा विचार करतात. त्यामुळेच त्या मानसिकदृष्ट्या सक्षम आणि बलशाली ठरतात. महिलांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय वाटचालीचे कथन ग्रंथरुपाने करायला हवे.   

डिकसळ सारख्या ग्रामीण भागात प्रारंभी दळणवळणाच्या सोयी सुविधा नसतानाही पूर्वीचे दिवस जेखरीचे गेले. अशातच शिक्षण व सामाजिक क्षेत्रामध्ये हिरारीने भाग घेऊन महिलांना सामावून घेऊन परिवर्तनाला सुरुवात केली. अशातच माझ्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन गावाला प्रथम क्रमांकाचे 15 लाख बक्षीस मिळवून दिले. त्यामुळे तर आज आमचा गाव पाणीदार झालेला आहे. सावित्रीच्या लेकी या ग्रंथांमध्ये जिल्ह्यातील 15 महिलांमध्ये मी सामाविष्ट आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. यात मी माझे आत्मचरित्र लिहिले. आता दुसऱ्यांचे आत्मचरित्र लिहिण्यास मला बळ मिळाले आहे.

                                                                - शशिकला बाबर 

                                                    सावित्रीच्या लेक माजी सरपंच डिकसळ

सूत्रसंचालन प्रा. अंजना गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. वनिता चंदनशिवे यांनी करुन दिला तर आभार शारदा गजभिये यांनी मांडले. यावेळी या ग्रंथातील सहभागी लेखिका सुशीला वनसाळे,  प्रा. अंजना गायकवाड, सुनिता गायकवाड, शारदा गजभिये, प्रेमलता कांबळे, डॉ. वनिता चंदनशिवे, प्रमिला उबाळे, जयश्री रणदिवे, शीला हावळे, नीना गायकवाड, वत्सला गोगी, सुलभा जगझाप, मायादेवी गायकवाड, शशिकला बाबर, फुलावती काटे या महिलांची मनोगते झाली. 
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. 
 थिंक टॅंक पब्लिकेशन्सच्या प्रकाशिका रसिका भंडारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.