सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये गरबा आणि दांडिया उत" /> सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये गरबा आणि दांडिया उत्सव जल्लोषात संपन्न
IMG-LOGO
Home खेळ सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये गरबा आणि दांडिया उत्सव जल्लोषात संपन्न
खेळ

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये गरबा आणि दांडिया उत्सव जल्लोषात संपन्न

October 2025 172 Views 0 Comment
IMG

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये गरबा आणि दांडिया उत्सव जल्लोषात संपन्न

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे या महाविद्यालयात भव्य गरबा उत्सवाचे
आयोजन करण्यात आले होते त्यास विद्यार्थ्यांनी भरघोस सहभाग दर्शिवला. या गरबा आणि दांडिया उत्सवाचे उदघाटन
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, कै.अभिजित कदम
विद्यालय मेथवडे या शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.एन.मेटकरी, श्री.डी.एन.जाधव यांच्या हस्ते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर

कर्मचारी, पालक, नागरिक, सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले.शारदीय नवरात्रोत्सवात भक्तगण देवीची मनोभावे
पूजा करतात व न चुकता गरबा आणि दांडिया खेळला जातो.नृत्याचे हे दोन्ही प्रकार खूप शक्तीशाली आहेत, जे मनाला
आनंद तर देतातच शिवाय आरोग्यालाही फायदेशीर ठरतात. कारण गरबा आणि दांडिया खेळून वेट लॉस सह स्ट्रेसही दूर
करता येतो अश्या या दांडीया उत्सवात विविध गाण्यावर वेगवेगळे पेहराव घालून विदयार्थ्यांनी गरबा व दांडीया
खेळल्या. प्रथमतः विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुप मधून वेगवेगळ्या गाण्यावर दांडीयाचे प्रदर्शन केले. त्यानंतर सामूहिक

दांडीया खेळल्या गेल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.अंजली घुले व चि.ओंकार हत्तुरे यांनी केले.