सांगोला प्रतिनिधी
गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला या ठिकाणी झालेल्या १९ वर्षे वयोगट मुले कबड्डी स्पर्धा अंतिम सामन्यात सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला हा संघ विजयी झाला.या संघाने सुरुवातीस श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरा, कै.सौ वत्सलादेवी देसाई विद्यालय व आण्णासाहेब घुले (सरकार)क.म.जवळा या संघांचा पराभव करून अंतिम सामन्यात कै.स.शा.लिगाडे विद्यालय व जुनिअर कॉलेज अकोला या संघाचा ०४ गुणांनी पराभव करत अंतिम सामना जिंकला.सदर कबड्डी संघ:- सुजल पाटील, अविनाश केदार, शुभम गोरे, रणवीर जगताप, सुशांत ऐवळे, निखिल बनसोडे, निखिल माने, ओम जाधव,अभिषेक सावंत, विजयकुमार नरळे, अविनाश बनसोडे, सोहम इंगोले. हे खेळाडू सहभागी झाले होते.वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रशाला - श्री सुनील भोरे , क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील, श्री नरेंद्र होनराव ,श्री सुभाष निंबाळकर , प्रा.संतोष लवटे. यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके , सचिव मा. मल्लिकार्जुन घोंगडे , खजिनदार मा. शंकरराव सावंत सर,सहसचिव मा. प्रशूद्धचंद्र झपके साहेब, संस्था सदस्य मा. विश्वेशजी झपके,प्राचार्य श्री गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते , उपप्राचार्या सौ शाहिदा सय्यद , पर्यवेक्षक - श्री बिभीषन माने , श्री पोपट केदार (क्रीडा नियंत्रक), श्री अजय बारबोले व सर्व अध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.