डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील सुजाता बाबर विद्यापीठात प" /> डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील सुजाता बाबर विद्यापीठात प्रथम
IMG-LOGO
Home खेळ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील सुजाता बाबर विद्यापीठात प्रथम
खेळ

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील सुजाता बाबर विद्यापीठात प्रथम

November 2023 129 Views 0 Comment
IMG

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील सुजाता बाबर विद्यापीठात प्रथम 

सांगोला प्रतिनिधी -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत मैदानी स्पर्धा सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथे मोठ्या उत्साहात दिनांक 17 18 19 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडल्या

सोलापूर विद्यापीठ अंतर्गत या स्पर्धेत 29 महाविद्यालयातील मुला मुलींनी भाग घेऊन स्पर्धेतील रंगत वाढवली सांगोला तालुक्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये नाव असणाऱ्या डॉ. की गणपतराव देशमुख महाविद्यालयाची खेळाडू कुमारी सुजाता श्रीकांत बाबर बी.ए. भाग 1 हिने कौशल्यपूर्ण आणि सहजरित्या 1-50 मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला.
याच स्पर्धेत महाविद्यालयातील जाने माने धावपटू श्री अमोल नानासो आमुने बी. ए. भाग 1 याने पुरुषांच्या 21 किलोमीटर धावणे हाप्प मॅरेथॉन स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला श्री अमोल अमुणे यांनी दहा नोव्हेंबर 2023 रोजी के एन भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे झालेल्या सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धे मध्ये 46 ते 49 वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.
वरील खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजय पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलानी व संस्था सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांचे प्रोत्साहन मिळाले. व मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंच्या सत्कार करण्यात आला.