घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्व" /> घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
IMG-LOGO
Home संस्कृती घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
संस्कृती

घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

December 2025 169 Views 0 Comment
IMG

घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

 विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

 घेरडी (सचिन चंदनशिवे ):

 सांगोला तालुक्यातील घेरडी येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही वैराग्यमूर्ती सद्‌गुरू संत भोजलिंग महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने व घेरडी ग्रामस्थ आयोजित, वारकरी आणि भजनी मंडळाच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर पासून गुरुवार दिनांक १८ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 घेरडी ता. सांगोला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अध्यात्मिक व भक्तीमुळे वातावरणामध्ये शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 पासून कीर्तन प्रवचन भजन यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता कलश पूजन विना पूजन प्रतिमापूजन व ग्रंथ पूजन यांनी या सप्ताहाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक ह भ प भागवताचार्य रमेश महाराज शिवापुरकर सोलापूर हे आहेत. सप्ताहात रोज पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 11 ते 12 गाथा भजन दुपारी दोन ते चार संगीत भजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडेसात प्रवचन रात्री 7:45 ते 10 हरिकीर्तन व त्यानंतर महाप्रसाद असे संपूर्ण सप्ताह भर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गाथा व संगीत भजन साठी संत कान्होपात्रा भजनी मंडळ घेरडी, श्री दत्त भजनी मंडळ घेरडी, माऊली संगीत महिला भजनी मंडळ घेरडी पारे, संत सावतामाळी भजनी मंडळ घेरडी, ज्योतिर्लिंग भजनी मंडळ हंगीरगे,माऊली संगीत महिला भजनी मंडळ घेरडी पारे हे सहभागी होणार आहेत. रोज सायंकाळी ह भ प अंबादास माने, ह भ प रोहित लेंडवे, ह भ प मच्छिंद्र चन्ने, ह भ प भाऊसाहेब पोळ, ह भ प संपतराव कोळेकर, ह भ प विनायक कुलकर्णी यांचे प्रवचन होणार आहे.

 या सप्ताहाच्या निमित्ताने रोज सायंकाळी 7:45 ते 10 या वेळेत हरिकीर्तन होणार असून यामध्ये कोल्हापूर येथील ह भ प राजीव सुतार, संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प सोहम महाराज देहूकर, इंचगिरी रसाळ संप्रदाय पंढरपूरचे ह भ प चैतन्य महाराज रसाळ, सद्गुरु भोजलिंग महाराजांचे वंशज ह भ प विठ्ठल महाराज बंडगर, संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज ह भ प ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह भ प नारायण महाराज गरड यांचे प्रवचन होणार असून ह भ प रमेश महाराज शिवापुरकर यांचे सोपान काका समाधी फुलांचे सोहळ्याचे कीर्तन होणार आहे. गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी सात ते साडेनऊ ग्रंथ दिंडी त्यानंतर काल्याचे किर्तन याचबरोबर संत माणकोजी महाराजांचे विद्यमान वंशज धामणगाव गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले यांचे हरिकीर्तन होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी रोहिदास जगधने, महादेव माळी भाऊसाहेब पोळ, जगन्नाथ जगधने, शुभम साळुंखे, तुकाराम जगधने,समाधान पुकळे,शंकर शिंदे,बटू अशोक गुजले,तानाजी पुकळे,पांडुरंग माळी, संपतराव कोळेकर,,मच्छिंद्र महाराज,अभिमन्यू गोमासे, शिवाजी लोहार, तानाजी भजनावळे, बाळू माने,महादेव जगधने, पोपट माळी, वसंत लांडगे,तुकाराम माने यांच्यासह घेरडी व परिसरातील भाविक भक्त परिश्रम घेत आहे. घेरडी व परिसरातील भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त घेरडी ग्रामस्थ व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने करण्यात आले आहे.