
सांगोला, प्रतिनिधी :
डॉक्टर डे निमित्त सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “सांगोला मॅरेथॉन 2K26″ या राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात येणार असून, आरोग्याविषयी जनजागृती व फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
धावा आरोग्यासाठी… धावा सांगोल्यासाठी!” या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सांगोलकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन समृध्दी अर्बन बँकेचे संचालक आणि यशोदा हॉस्पिटल चे डॉ विजय बंडगर यांनी केले आहे

या स्पर्धेमध्ये १० किलोमीटर व ५ किलोमीटर अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला असून राज्यभरातील धावपटूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे व सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
सांगोला शहरातील विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी नागरिक तसेच युवक-युवती या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. स्पर्धेचे नियोजन, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि धावपटूंसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असून इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आय.एम.ए असो. सांगोला चे जेष्ठ मार्गदर्शक डॉ विजय बंडगर यांनी केले आहे.