शासन निर्णया नुसार दुधाला दर न देणाऱ्या सहकारी व खाजगी दुध संस" />
सांगोला / प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्राल्याने पारित केलेल्या शासन निर्णया नुसार गाईच्या दुधाला प्रतिलीटर गुणांक ३.५/६.५यास ३४ रुपये दर जाहीर केलेला असताना वास्तविक सांगोला तालुक्यातील सहकारी व खाजगी दुधसंस्था शासनाच्या जीआर नुसार दर देत नाहीत. त्यामुळे सदर संस्थावरती भा.द.वि. १८८, ४२०,१ ४०६, ४०९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सांगोला तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने मा. तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पी.एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांना त्यांना मिळणारा मोबदला तात्काळ देण्यात यावा.मा. पंतप्रधान भारत सरकार यांचे नावाने पीएम किसान योजना राज्यात लागू केलेली असून सदर पीएम किसान योजनेमार्फत प्रस्तुत लाभाधिकारी यांना वार्षिक पेन्शन मोबदला दिला जात असून सदर पेन्शन मोबदला हा बहुतांश लाभाधिकाऱ्यांना मिळालेला नसून तहसिल कार्यालयात संबंधीत लाभाधिकारी यांनी हेलपाटे घातल्यानंतर त्यांना आपले कार्यालयातील समर्पक अशी उत्तर दिले जात नाही. त्यामुळे प्रस्तुत पीएम किसान योजनेची अमंलबजावणी प्रकर्षाने करणेत यावी व लाभाधिकारी यांना त्वरीत मोबदला मिळणे संदर्भात आपले स्तरावरून कार्यवाही व्हावी. अशी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच सांगोला बाजारात सुर्यफुल व इतर धान्यांची क्विंटल मागे होणारी आडत्याकडून लुट थांबविली जावी. तसेच भाज्याच्या बाजारात होणारी शेतकऱ्यांची लुट थांबविली जावी. अन्यथा तीव्र आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर चे निवेदन तहसिलदार संतोष कुणसे, उपनिबंधक प्रकाश नालवार , मार्केट कमिटी सभापती, सचिव पाटील यांना देण्यात आले आहे . यावेळी शेतकरी संघटना प्रदेश सचिव बाळासाहेब वाळके , तालुका अध्यक्ष ॲड. विशाल भोसले , उपाध्यक्ष वैभव खुळे, दत्तात्रय कारंडे , दादा बाढ, राहुल शिंदे , अशोक शिनगारे, चंद्रकांत खरात , बजरंग पारसे आदी उपस्थित होते.