उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे दिव्यांग विद्" /> उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे दिव्यांग विद्यार्थीसाठी शिबीर संपन्न
IMG-LOGO
Home सामाजिक उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे दिव्यांग विद्यार्थीसाठी शिबीर संपन्न
सामाजिक

उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे दिव्यांग विद्यार्थीसाठी शिबीर संपन्न

December 2020 394 Views 0 Comment
IMG
उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे दिव्यांग विद्यार्थीसाठी शिबीर संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :
पंचायत समिती (शिक्षणं विभाग) सांगोला यांच्या वतीने गुरुवार दि 24 डिसेंबर रोजी सांगोला शहर व वाढेगाव भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र व ओळखपत्रा करिता ऑनलाईन नोंदणी शिबीर उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे संपन्न झाले.
या शिबिरासाठी उत्कर्ष विद्यालय माध्यमिक चे मुख्याध्यापक सिद्धेश्वर कुलकर्णी, उत्कर्ष विद्यालय प्राथमीक चे मुख्याध्यापक विश्रांती बनसोडे, अविनाश पोफळे, उत्कर्ष विद्या सांगोला यांचे सहकार्य लाभले. हे शिबिर पार पाडण्यासाठी दत्तात्रय केंगार, विठ्ठलपंत शिंदे, शिवराज पांचाळ, सचिन गुंड, अमोल पाटोळे यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण शिबिरा वेळी केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण, ईश्वर भोसले यांनी मार्गदर्शन केले.
आजतागायत तालुक्यातील 250 दिव्यांग मुलांची नोंदणी झाली असून. सदर नोंदनी करिता विविध प्रशालेत शिबीर आयोजित केली जात आहेत. यामध्ये तालुक्यातील शालेय दिव्यांग विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी केले आहे.