सांगोला प्रतिनिधी
नुकताच दिनांक 17 एप्रिलला प्रदर्शित झालेला सालबर्डी अंगावर काटा आणणारी रहस्य कथा हा चित्रपट महाराष्ट्रातील थिएटर मध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यामध्ये शुभांगीने वसुधा नावाची भुमिका साकारली आहे सांगोला तालुक्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट.
सालबर्डी या चित्रपटामध्ये अंधारात लपलेली एक अनोळखी कहाणी आहे जिचे सत्य आजवर कोणालाही कळले नाही. सालबर्डी या शांत निरागस वाटणाऱ्या गावात अचानक काही घटना घडू लागलेल्या या गूढ घटनांनी गावात भीतीचे सावट पसरलेले आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि वातावरणात दडलेला अनामिक थरार! या सगळ्याच्या मध्यभागी आहे ते रहस्य .... जी अचानक गावात येते आणि घटनांचा वेगच बदलून टाकते .... या घटनांचा आणि तिचा काय संबंध, ती सत्य शोधायला आली आहे की, स्वतःच एखादा गुढ रहस्य घेऊन .......इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही. ते नेहमीच अनुत्तरीत राहतात.काही शोध घेताना ते अजून वेगळ्या रहस्यांना जन्म देतात.
महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या सालबर्डी या गावात अशाच एका रहस्य त्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधांची कहाणी सांगणारा 'सालबर्डी' हा चित्रपट 17 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
भय आणि रहस्यांच्या विळख्यात अनपेक्षित घटनेमागचे रहस्य शोधताना काय होणार हे, रहस्य कोण आणि कसे बाहेर काढणार याची उत्कंठा प्रेक्षकांना जागेला खिळवून ठेवते.
या चित्रपटामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. रमेश चौधरी याँनी दिग्दर्शन केले आसुन या चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश मोरे , पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे ,गुरु ठाकूर ,मुकुंद बालराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभलेल आहे. पार्श्व संगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे.अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभलेला आहे. नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर व आशिष पाटील यांनी केलेले आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटामध्ये पूजा सावंत मुख्य भूमिका मध्ये तर सोनाली कुलकर्णी,शशांक शेंडे, ओंकार भोजने, भरत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते,चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, कोमल चौधरी या मराठी कलाकारांबरोबर सांगोला तालुक्यातील कोल्हापूर स्थित अभिनेत्री शुभांगी गायकवाड हिचा दमदार अभिनय प्रेक्षकांना एक वेगळी ऊर्जा देऊन जात आहे. याचबरोबर आकर्षक कोरिओग्राफी भन्नाट स्टेप्स व कलाकारांची अभिनय क्षमता यामुळे चित्रपट एक वेगळ्या उंचीवर व प्रेक्षकांसाठी एक रहस्यांची दमदार मेजवानी ठरणार आहे.