अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार ; मा.आम" /> अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा
IMG-LOGO
Home राजकारण अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा
राजकारण

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा

June 2026 6 Views 0 Comment
IMG

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा 

वाढत्या भारनियमनामुळे पशुपालक आणि विद्यार्थी चिंतेत 

भारनियमन आणि पाणीटंचाईवर दिपकआबा आक्रमक 

सांगोला / तालुका प्रतिनिधी

यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील आणि शेतकरी पशुपालक चिंतेत आहेत. आठ दिवसात तालुक्यातील भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही असा इशारा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. 

सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जाणवणाऱ्या दैनंदिन समस्या याबाबत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड पंचायत समिती सभापती पुनम इंगवले यांच्यासह तानाजीकाका पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर, सखाराम तंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम बाबर, अरुणभाऊ घुले, डॉ.सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे, विजयकुमार शिंदे, चंद्रकांत चौगुले, समीर पाटील, विजय येलपले, डॉ.राज मिसाळ, संतोष पाटील, अनिल खडतरे, सचिन लोखंडे, शिवाजीनाना बनकर, विजय पवार यांच्यासह दीपकआबा साळुंखे पाटील गटाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले मात्र, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने टेंभूचे पाणी सोडण्यात अडचणी निर्माण झाल्या. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासू लागली आहे. कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कामाला लागावे. भविष्यकाळाच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पराभवाने खचून जाणारा मी नेता नाही. यापुढे दक्ष राहून राजकारण करण्यासाठी तयार असून पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. ग्रामपंचायतीवर आपली सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सोईस्कर भूमिका घ्यावी.राजकारणाच्या पुढील काळात कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तोच निर्णय घेतला जाईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. 

     यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड म्हणाल्या की, तालुक्यात विजेचा, पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी गट तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जावे. कार्यकत्यांनी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या कार्यकर्ता आढावा बैठकीत सभापती पूनमताई इंगवले, तानाजीकाका पाटील, विजयकुमार शिंदे, विजयदादा येलपले, विलास व्हनमाने, बाबासाहेब तोडकरी, भाऊसाहेब यमगर सर, शहाजी खरात, डॉ.अक्षय चोरमुले, तानाजीराव बाबर, ॲड.संपतराव पाटील, शिवाजीराव कोळेकर, शिवाजीनाना बनकर, चंद्रकांत चौगुले, विजय पवार, अजिंक्य शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

वीज वितरण कंपनीला आठ दिवसांचा अल्टिमेटम

येणाऱ्या सोमवारी सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाला सोमवारी लेखी निवेदन देऊन भारनियमन कमी करण्यास आठ दिवसांची मुदत देण्यात येईल. तरीही, भारनियमन कमी न झाल्यास मात्र कार्यकर्त्यांना घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येतील असे या आढावा बैठकीत सर्वानुमते ठरले. 

स्थानिक पातळीवर सर्व अधिकार कार्यकर्त्यांना 

सांगोला तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक समीकरण लक्षात घेऊन कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार द्यायचा आणि कोणत्या गावात कोणत्या गटासोबत आघाडी करायची याचे संपूर्ण अधिकार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात आले तसेच आपापसातील मतभेद विसरून खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.

 कार्यकर्ता आढावा बैठकीला सभेचे स्वरूप

अवघ्या १२ तासापूर्वी तातडीने बोलावलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीला सांगोला शहर आणि तालुक्यातील आबा प्रेमी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि उत्साह यामुळे आढावा बैठकीला जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले.