सोनलवाडी येथे डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट" /> सोनलवाडी येथे डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट..
IMG-LOGO
Home राजकारण सोनलवाडी येथे डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट..
राजकारण

सोनलवाडी येथे डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट..

April 2022 826 Views 0 Comment
IMG

सोनलवाडी येथे डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट....

 

कोळा वार्ताहर

सांगोला तालुक्यातील सोनलवाडी गावचे सरपंच महादेव बुरुंगले युवा नेते धनाजी बुरुंगले यांच्या निवासस्थानी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली डॉ देशमुख यांचा चेअरमन रामहरी बुरुंगले कुटुंबियांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावातील नेतेमंडळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनलवाडी गावातील ग्रामस्थांनी भेटीदरम्यान विविध आडचणी समस्या डॉ देशमुख यांच्या पुढे व्यक्त केल्या गावातील ज्येष्ठ मंडळी कॉलेजचे विद्यार्थी यांना येणे जाण्यासाठी एकही एसटी बस सुरू नाही सकाळची सांगोला मोटेवाडी एसटी तात्काळ सुरू करावी तसेच महावितरण च्या वायरमन संदर्भात अडचणी मांडल्या आदी मागण्यासह सोनवाडी बागलवाडी ग्रामस्थांनी मागण्या मांडल्या डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

या कार्यक्रमास सरपंच महादेव बुरुगले पत्रकार जगदीश कुलकर्णी, चेअरमन रामहारी बुरुंगले, हनमंत मोरे, महादेव मोरे, भारत वाघमोडे, शंकर बुरुंगले, भगवान कारंडे, ग्रामपंचायत सदस्य दादा शेजाळ,दादा शिंगाडे, धनाजी बुरुंगले, प्रकाश बुरुंगले, वसंत बुरुंगले, अण्णा बुरुंगले, किरण वाघमोडे, सचिन वाघमोडे, संजय वाघमोडे, तातोबा वाघमोडे, समाधान वाघमोडे, राहुल शेजाळ, सुनील वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे, सुनील बुरुंगले, निलेश मोटे, पोपट शेजाळ, धुळा खरात, नाना खरात, सचिन शिंगाडे, बंडू कारंडे, सुभाष कारंडे, पोपट बुरुंगले, दशरथ बुरुंगले, सिताराम बुरुंगले, दादा खरात, दादा बुरुंगले, पपू वाघमोडे, गोपाळ बुरुंगले यांच्यासह सोनलवाडी बागलवाडी परिसरातील नेतेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक धनाजी बुरुंगले मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.