अजनाळे गावातील डी.सी.सी. बँकेत सोनेतारण कर्जामध्ये घोटाळ्याची " /> अजनाळे गावातील डी.सी.सी. बँकेत सोनेतारण कर्जामध्ये घोटाळ्याची सांगोला तालुक्यात चर्चा..!
IMG-LOGO
Home राजकारण अजनाळे गावातील डी.सी.सी. बँकेत सोनेतारण कर्जामध्ये घोटाळ्याची सांगोला तालुक्यात चर्चा..!
राजकारण

अजनाळे गावातील डी.सी.सी. बँकेत सोनेतारण कर्जामध्ये घोटाळ्याची सांगोला तालुक्यात चर्चा..!

March 2025 681 Views 0 Comment
IMG

अजनाळे गावातील डी.सी.सी. बँकेत सोनेतारण कर्जामध्ये घोटाळ्याची सांगोला तालुक्यात चर्चा..!

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक मर्या.सोलापूर शाखा अजनाळे तालुका सांगोला बँकेत सोनेतारण कर्ज योजनेत व्हॅल्यूअर ने खातेधारकांनाच (गावातील नागरिकांना ) फसवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याची चर्चा सर्वत्र तालुक्यात सुरु आहे. 1 नाही 2 नाहीतर 11 नागरिकांना फसवून नागरिकांच्या नावावर बनावट सोन्याचे दागिने तारण ठेऊन कर्ज काढून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच बँकेत सोनेतारण म्हणून ठेवलेले सोनेही बनावट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

    अजनाळे गाव हे डाळिंबाचे गाव म्हणून जग प्रसिद्ध आहे. परंतु डी.सी.सी. शाखा - अजनाळे बँकेत असे चुकीचे प्रकार घडू लागले आहेत.या बनावट सोन्याच्या घटनेमुळे बँकेत मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी डीसीसी बँकेची अधिकारी बँकेत येऊन तपासणी करून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरचा प्रकार गंभीर असल्यामुळे आरोपीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते, परंतु सदरचा घोटाळा उघडकीस आणण्याचे धाडस करत नसल्याचे समजते. फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी सांगोला पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डीसीसी बँकेतील सोनेतारण कर्जाच्या घोटाळ्याचे प्रकरण दाबण्याचा प्रकार चालू असल्याची चर्चा संपूर्ण तालुका भर पसरली आहे.

 

 बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीसीसी बँकेतील सर्व सोनेतारण दागिण्यांची सत्यता पडताळणी पूर्ण केली पाहिजे. गोल्ड व्हॅल्यूअर नेमण्याचे काय नियम आहेत? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठेविंवर कर्ज देण्यासाठी असलेले नियम व प्रकिया काय? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.