देव तारी त्याला कोण मारी; २ चिमुरड्याचे वाचले प्र" />
सांगोला प्रतिनिधी
नागपूर गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सांगोला नाजिक मंगळवेढा तालुक्यातील अंधाळगाव जवळ दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पहाटे चार च्या सुमारास रस्त्यावर थांबलेल्या अवस्थेत असलेल्या पवन चक्की चे साहित्य घेवून चाललेल्या ट्रेलर ला केए २७ बी ८१८८ या भरधाव वेगाने आलेल्या क्रूझर गाडीने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये क्रुझर मधील लक्ष्मी कुंभार वय ३० यांचा जागीच मृत्यू झाला व सचिन कुंभार वय ३५ दोघेही रा कर्नाटक यांचा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातामध्ये ड्रायव्हर अब्दुल मण्यार रा अफजल्पुर ता इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक यांना रस्त्यावर जाणाऱ्या ट्रक व जेसीबी लावून क्रुझार मधून बाहेर काढण्यात आले.
या अपघातामध्ये मयत कुंभार दापांत्याचे दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले.परंतु आश्चर्यकारकरित्या अपघातातून बचावले आहेत त्यांना जागेवर किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे १०८ अँब्युलन्स मधून पाठविण्यात आले.
सदर अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील बी.व्ही.जी १०८ अँब्युलन्स तातडीने अपघात स्थळी जावून तब्बल 2 तास बचाव कार्य मंगळवेढा पोलिस स्टेशन चे पो. काँ.पठाण व त्यांचे सहकारी त्याच बरोबर सांगोला १०८ अँब्युलन्स चे मेडिकल ऑफिसर डॉ वैभव जांगळे व पायलट सूरज कुंभार यांनी मोठ्या तातडीने मदतकार्य पार पडले. जखमींना पुढील उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.