सांगोला (तालुका प्रतिनिधी): अजनाळे ता.सांगोला येथील महादेव मंदिराच्या बाजूस असलेल्या झाडाखाली मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोकॉ शशीकांत सुरेश सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादासो बिराजी भडंगे, जनार्दन अर्जुन कोळवले, श्रीरंग श्रीपती कोळवले, उध्दव केशव धांडोरे, सदाशिव संभाजी येलपले, समाधान बाबुराव धांडोरे सर्व राहणार अजनाळे, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगोला पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, पो.ना. कोष्टी, पो.कॉ.शशीकांत सावंत, पोना देवकते यांना बातमीदारामार्फत बातमी अजनाळे गावातील महादेव मंदीराच्या बाजुस असलेल्या झाडाखाली काही लोक मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या आधारे पोलीसांच्या वरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दादासो बिराजी भडंगे, जनार्दन अर्जुन कोळवले, श्रीरंग श्रीपती कोळवले, उध्दव केशव धांडोरे, सदाशिव संभाजी येलपले, समाधान बाबुराव धांडोरे सर्व राहणार अजनाळे, ता. सांगोला हे सर्वजण गोल रिंगण करुन मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत 3 हजार 870 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. याबाबत पोकॉ शशीकांत सुरेश सावंत यांनी दादासो बिराजी भडंगे, जनार्दन अर्जुन कोळवले, श्रीरंग श्रीपती कोळवले, उध्दव केशव धांडोरे, सदाशिव संभाजी येलपले, समाधान बाबुराव धांडोरे सर्व राहणार अजनाळे, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.