मांजरीत शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा द" /> मांजरीत शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
IMG-LOGO
Home राजकारण मांजरीत शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजकारण

मांजरीत शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

November 2024 430 Views 0 Comment
IMG

मांजरीत शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सांगोला : तालुका प्रतिनिधी

शहाजीबापू गटासह शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील मांजरी येथील शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांसा शेकापच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. मांजरीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटासह शेकापला खिंडार पडले आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.
मांजरी ता.सांगोला येथील बजरंग शिनगारे, अर्जुन शिनगारे, माणिक साळुंखे, धनाजी साळुंखे, शिवाजी मोलाणे, सागर मोलाणे, संजय फाटे, अनिल साळुंखे, नितीन साळुंखे, गोपाळ साळुंखे, अक्षय जगताप, विजय जगताप, अक्षय पवार, कालिदास शिनगारे, बलभीम शिनगारे, संतोष कांबळे या शहाजीबापू गटासह शेकापच्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली.