सांगोला विद्यामंदिरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह" /> सांगोला विद्यामंदिरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
IMG-LOGO
Home शैक्षणिक सांगोला विद्यामंदिरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

May 2023 149 Views 0 Comment
IMG

सांगोला विद्यामंदिरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी


सांगोला ( प्रतिनिधी) कुशल प्रशासक,प्रजानिष्ठ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सां.ता.शि.प्र.मंडळ सांगोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्राचार्य लक्ष्मण जांगळे व काकासाहेब नरूटे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थासचिव म.शं.घोंगडे, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य नारायण विसापूरे, नाझरा विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने,कोळा विद्यामंदिरचे पर्यवेक्षक रफिक मणेरी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.