सांगोला : पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत प्रणित महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला या अभियांत्रिकी महाविद्यालयास कृतीशील अभियांत्रिकी महाविद्यालय हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंहगड कॉलेज, कोर्टी रोड पंढरपूर येथे वितरित करण्यात आले असल्याची माहिती फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे यांनी दिली.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून व शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये प्रयत्न करून महाविद्यालयाचे नावलौकिक प्राप्त केले असल्यामुळे कृतिशील अभियांत्रिकी महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च चे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, डीन अकॅडेमिक डॉ. शरद पवार, सिव्हील इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी, मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा.राहुल अवताडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. मल्लाड .एच.एम. व ए. आय. अँड डी.एस इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनायक साळे, प्रा.शरद आदलिंगे, डॉ.गणेश बिराजदार, डॉ.सुरज निकते आदि उपस्थित होते.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयास कृतीशील अभियांत्रिकी महाविद्यालय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य , सर्व विभागाचे विभाग प्रमुख , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.