जागतिक जलदिनानिमित्त माणगंगा नदीची स्वच्छता
सांग" />
सांगोला (प्रतिनिधी) - जागतिक जलदिनाचे औचित्य साधून दि. २२ मार्च रोजी वाढेगाव ता. सांगोला येथील को.प. बंधारा ते त्रिवेणी संगम परिसरातील नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करून वाहतूक पुलाच्या दोन्ही बाजूला सूचनाफलक लावून नदीपात्रात कसलीही घाण किंवा टाकाऊ वस्तु टाकू नयेत. नदीचे पावित्र्य राखावे अशा प्रेरणादायी सूचनाचे फलक लावून नदी स्वच्छतेसाठी आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावाशेजारी वाहतूक पूल आहेत. त्या सर्व पुलावर असे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती माणगंगा ब्रह्मणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे यांनी दिली. नदी स्वच्छता फलकाचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ. विजयकुमार जाधव, दत्ता हजारे, सत्यवान कांबळे, अजित साठे, शिवाजी सूर्यगंध इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित होते.