सांगोल्याची भूमी डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पा" /> सांगोल्याची भूमी डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पावन-प्रसिद्ध कवी संदीप जगताप
IMG-LOGO
Home संस्कृती सांगोल्याची भूमी डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पावन-प्रसिद्ध कवी संदीप जगताप
संस्कृती

सांगोल्याची भूमी डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पावन-प्रसिद्ध कवी संदीप जगताप

December 2024 123 Views 0 Comment
IMG

सांगोल्याची भूमी डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पावन-प्रसिद्ध कवी संदीप जगताप

  

  न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला प्रतिनिधी 

   सांगोल्याची माती डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने पवित्र झाली आहे व सांगोल्याची ओळख डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे, असे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रसिद्ध कवी व लेखक श्री संदीप जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतमध्ये सांगितले. आई हेच ज्ञानाचे पहिले विद्यापीठ असून आई-वडील हेच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. लोकांसाठी कार्य करा त्याचे फळ निश्चित तुम्हाला मिळते. आपण सामाजिक कार्य करत असताना अभिमान असणे गरजेचे पण कसलाही गर्व नसावा. सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक विरोध पत्करून सुद्धा स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. आयुष्य कसं जगावं हे ज्यांना समजले तो आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. अशाप्रकारे प्रसिद्ध कवी श्री संदीप जगताप यांनी आपले विचार कवितांच्या माध्यमातून सांगून उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पारितोषिक वितरण समारंभा मध्ये ज्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मार्गदर्शन करताना संस्था अध्यक्ष डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी या शैक्षणिक संस्थेची स्थापना सांगोला तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे व या तालुक्यातील सर्व कुटुंब शैक्षणिक प्रगती करून समाजामध्ये सन्मानाने जीवन जगू शकेल या उद्देशाने व डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या प्रेरणेने झाली असल्याचे सांगितले. इथून पुढील काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेले नवनवीन बदल स्वीकारून या तालुक्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना सुद्धा उच्चशिक्षणासाठी परगावी जावे लागणार नाही, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास म्हणजेच समाजाचा विकास आणि साहजिकच या मधून एक सुसंस्कृत समाज निर्माण होईल यात तीळ मात्र ही शंका नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी या शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये, नीट जेईई, एम एच टी सी इ टी, शिष्यवृत्ती परीक्षा, एन एन एम एस व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, प्रा.चंद्रप्रभा माने मॅडम, प्रा.चांगदेव माळी सर, साईश्वरी खडतरे मॅडम , प्रा संतोष राजगुर, प्रा हनुमंत श्रीराम, रोहित पिंजारी पाटील,निलोफर मुजावर मॅडम, प्रा तानाजी गावडे, प्रा नीलिमा मिसळ मॅडम, दिपाली तोडकरी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. 

    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे य, प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा चंद्रकांत इंगळे, सूत्रसंचालन प्रा. जयश्री पाटील, सौ वैशाली बेहेरे मॅडम, प्रा प्रकाश बाबर तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार यांनी मानले. 

   या कार्यक्रमाप्रसंगी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोलाचे संस्था सचिव माननीय विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य श्री अवधूत कुमठेकर मालक, संस्था सदस्य प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा.केशव माने, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे, उपप्राचार्य संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर पर्यवेक्षक श्री तातोबा इमडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज विभाग प्रा मिलिंद पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख माध्यमिक विभाग सौ.स्मिता इंगोले मॅडम, कार्यक्रम आयोजन समितीचे प्रमुख प्रा चंद्रकांत इंगळे, प्रा जालिंदर टकले, माजी उपनगराध्यक्ष श्री गजानन बनकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मधील सर्व सेवानिवृत्त पदाधिकारी व शिक्षक, तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभ नंतर विद्यार्थ्यांच्या आवडीचा कार्यक्रम संपन्न झाला, यामध्ये विद्यार्थ्यांनी शेलापागोटेचा मनमुराद आनंद घेतला.