स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फु" /> स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया...
IMG-LOGO
Home आरोग्य स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया...
आरोग्य

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया...

March 2025 307 Views 0 Comment
IMG

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया...

सांगोला प्रतिनिधी 

सत्तर वर्षाचा पुरुष अचानक बेशुद्ध पडला, बोलू शकत नव्हता, हात पाय हलवू शकत नव्हता सांगोला येथील एका दवाखान्यात आणले असता प्राथमिक अवस्थेमध्ये मेंदूमध्ये रक्तपुरवठा बंद झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले व सोलापूर येथील मेंदू मणका उपचार असलेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन जावे लागेल असे सांगितले काय करावे हे कळेना त्याच वेळेस पेशंट स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुना मेडशिंगी रोड वाढेगांव नाका येथे आणला. स्पंदन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने चेक केले. मेंदूचे स्कॅन केले त्यामध्ये उजव्या बाजूची मेंदूच्या रक्तवाहिनी मध्ये रक्तपुरवठा बंद झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले. ही अवस्था अतिशय गंभीर स्वरूपाची अवस्था असते त्यावेळी नातेवाईकांना सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली.नातेवाईकांनी तुमच्याकडे जेवढे होता होईल तेवढे करा स्पंदन मध्ये उपचार होणार नसेल तर पेशंट आम्ही घरी घेऊन जातो असा विश्वास दाखवल्यामुळे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची टीम कामाला लागली. सांगलीचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. देवदत्त पाटील यांना सर्व रिपोर्ट व तपासण्या पाठवून दिले असता त्यांनी ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले.त्यानुसार नातेवाईकांशी बोलून त्यांना संपूर्ण परिस्थितीचे कल्पना दिली असता त्यांनी ऑपरेशन करण्यास संमती दिली व रविवार दिनांक 2 मार्च रोजी मेंदू व मनका तज्ञ  डॉ. देवदत्त पाटील व त्यांच्या टीम ने क्रेनिओटॉमी नावाचे मेंदूवरील दाब कमी करण्याचे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी भूल तज्ञ म्हणून डॉ.शीतल येळपले यांनी काम पाहिले सदर ऑपरेशन अतिशय किचकट व गुंतागुंतीचे होते हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका , फुफुस, क्रिटिकल केअर ,लहान मुलांचे आजार ,स्त्रियांचे आजार ,हाडांचे आजार , पोटाचे आजार, नवजात बालक व आतड्यांच्या शस्त्रक्रिया अपघात इत्यादी विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात त्याचबरोबर सर्व कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.या वेळी डॉ योगेश बाबर, डॉ किरण जगताप , डॉ वैभव जांगळे,डॉ गणेश गुरव डॉ राहुल इंगोले उपस्थित होते.

 

 

 

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माणभूमी महिला नागरिक सहकारी बँक व स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्य विषयी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन ॲड. आयुब पटेल यांनी दिली