सदानंद नगर रोडवरील रहिवाश्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार;रहिवाशांनी मानले दैनिक सांगोला सुपरफास्ट चे आभार
IMG-LOGO
Home आरोग्य सदानंद नगर रोडवरील रहिवाश्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार;रहिवाशांनी मानले दैनिक सांगोला सुपरफास्ट चे आभार
आरोग्य

सदानंद नगर रोडवरील रहिवाश्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार;रहिवाशांनी मानले दैनिक सांगोला सुपरफास्ट चे आभार

February 2021 505 Views 0 Comment
IMG
 
 
 

 सदानंद नगर रोडवरील रहिवाश्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार : गटारीच्या कामासाठी 13 लाख 09 हजार 424 रुपयांना तांत्रिक मंजुरी 


याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी नागरिकांची मागणी

रहिवाशांनी मानले दैनिक सांगोला सुपरफास्ट सह नगरपालिकेच्या पदाधिकारी व प्रशासनाचे आभार

सांगोला प्रतिनिधी :
नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवकच नव्हे तर परिसरातील काही रहिवासी बदलले परंतु सांगोला शहरातील वासुद रोड, सदानंद नगर रोडवरील रहिवाश्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून रखडला आहे. याबाबत सांगोला नगरपालिकेकडून या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा याबाबत दैनिक सांगोला सुपरफास्ट या वर्तमानपत्रातून वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाने या मागणीची दखल घेत, वासुद रोड सदानंद नगर येथील चांदणे घर ते मनेरी घर आरसीसी पाईप गटार करणे कामासाठी अंदाजे रक्कम 13 लाख 09 हजार 424 रुपयांना तांत्रिक मंजुरी दिली आहे. सदर मंजूर रकमेतून लवकरच कामे सुरू होणार आहेत. यामधून मागील अनेक वर्षापासून सदानंद नगर परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. मात्र सदरची कामे प्रत्यक्षात सुरू करून नागरिकांना त्रास मुक्त करावे असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. सदर गटारीच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल व नागरिकांची दखल घेतल्याबद्दल या परिसरातील रहिवाशांकडून दैनिक सांगोला सुपरफास्ट सह नगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
सांगोला शहरातील वासुद रोडवरील सदानंद नगर परीसरात सुमारे 30 ते 40 हून अनेक कुटूंब मागील 25 ते 30 वर्षापासून रहिवाशी वास्तव्यास आहेत. तेंव्हापासून नगरपालिकेकडे सोयी सुविधा मिळविण्यासाठी नागरिक मागणी करीत होते. शहराची वाटचाल विकासाच्या दिशेने होत असताना सदानंद नगर मधील नागरिकांना रस्ता व गटारीसाठी आजही खटाटोप करावा लागत होता. सांडपाण्यासाठी गटारी नसल्यामुळे या परिसरात पाणी साचून राहात होते. यामुळे डासांच प्रादुर्भाव वाढुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. याबाबत नागरिकांनी नगरपालिका, नगराध्यक्ष व नगरसेवक, जिल्हा प्रशासन अधिकारी, मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे व तोंडी मागणी केली होती. निवेदनाद्वारे व तोंडी मागणीचे सत्र सुरू होते. परंतु या मागणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात होता. या परिसरातील नागरिकांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून फक्त पाहणी करून त्यांना आश्वासन दिले जात होती. मागील अनेक वर्षापासून या भागातील सांडपाण्याचा व गटारीचा कायमचा प्रश्न मार्गी लागला नाव्हता. राज्यातील क प्रवर्गाची सांगोला नगरपालिका आहे. या नगरपालिकेस स्वच्छतेच्या दृष्टीने व सोयी सुविधा उपलब्ध केल्या म्हणून बक्षीस मिळाले आहे. आजही नगरपालिका स्पर्धेत असून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सदानंद नगर हा परिसर स्वच्छतेमध्ये नाहीका व नगरपालिकेच्या कोणत्याही योजनेमध्ये बसत नाही का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत नागरिकांमधून या भागातील गटारीच्या प्रश्न संदर्भात ठोस निर्णय घ्यावा तसेच शहरामध्ये सुरु असलेल्या विकास कामाबरोबर या भागालाही बरोबर घ्यावे असाही सूर या भागातील रहिवासीमधून केला जात होता.
यावर सांगोला शहरातील सदानंद नगर गटारीचा प्रश्न उपस्थीत झाला. यावर मुख्याधिकारी बदलले, आरोग्य सभापती बदलले, विभागातील प्रशासकीय अधिकारी बदलले, दोन निवडणुका संपल्या. अनेक नगराध्यक्ष झाले. प्रभागाचे नगरसेवक बदलले परंतु गटारीचा व सांडपाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. याबाबत यापूर्वी सन 2019 पासुन दैनिक सांगोला सुपरफास्ट या वर्तमानपत्रातून बातमी प्रसिद्ध केल्या आहेत. सदर बातमी वरून नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, आरोग्य सभापती, प्रभागातील व इतर नगरसेवक त्याच बरोबर मुख्याधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना या प्रभागाला भेट देऊन तात्पुरत्या स्वरूपात गटारीचे साचलेले पाणी वाहते केले होते. तसेच लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही दैनिक सांगोला सुपरफास्ट कडून पाठपुरावा सुरू राहिला. सदानंद नगर परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेचे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 13 लाख 09 हजार 424 रुपयांना तांत्रिक मंजुरी दिली आहे.
मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असणारा सांडपाण्याच्या गटारीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने या परिसरातील रहीवाशांमधून दैनिक सांगोला सुपरफास्ट सह नगरपालिकेचे पदाधिकारी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

 
मागील चार ते पाच वर्षापासून सदानंद नगर परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात रहिवाशांच्या मागण्या आहेत. त्या अनुषंगाने वेगळ्या पद्धतीने पाठपुरावा देखील सुरू आहे. याबाबत नगरपालिका पदाधिकारी, प्रशासन व दैनिक सांगोला सुपरफास्ट वर्तमानपत्रातून याबाबत दखल घेतली. आणि नगरपालिका सभागृह मध्ये या गटारीच्या कामकाजासाठी तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. परंतु या कामाची तातडीने अंमलबजावणी व्हावी एवढीच माफक अपेक्षा....
दिगंबर पवार : सदानंद नगर परिसर रहिवाशी