सांगोला मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जूनोनीचे डॉ सुधाकर क" /> सांगोला मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जूनोनीचे डॉ सुधाकर कांबळे यांची निवड
IMG-LOGO
Home आरोग्य सांगोला मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जूनोनीचे डॉ सुधाकर कांबळे यांची निवड
आरोग्य

सांगोला मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जूनोनीचे डॉ सुधाकर कांबळे यांची निवड

January 2021 453 Views 0 Comment
IMG

सांगोला मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जूनोनीचे डॉ सुधाकर कांबळे यांची निवड..

असोसिएशन च्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर..

सांगोला प्रतिनिधी 

सांगोला मेडिकल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात सांगोला येथे पार पडली. यावेळी सन 2019 चे पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.यामध्ये जुनोनी येथील डॉ. सुधाकर कांबळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, त्याचबरोबर उपाध्यक्ष डॉ.प्रसाद साळे,डॉ. अतुल इंगळे ,सचिव डॉ.महेश राऊत,सहसचिव डॉ. संतोष पाटील,खजिनदार डॉ अण्णासो लवटे, सहखजिनदार डॉ. अभिजीत सोनलकर, महिला प्रतिनिधी डॉ. सुजाता पाटील व डॉ.जयश्री जाधव यांची निवड करण्यात आली.

                  त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली. महुद प्रतिनिधी म्हणून डॉ.श्रीकांत देशपांडे, कोळा- जुनोनी प्रतिनिधी डॉ. बापू सरगर, जवळा- घेरडी प्रतिनिधी डॉ. दयानंदराजे ता, नाझरा-बलवडी प्रतिनिधी डॉ.अर्जुन दबडे, सोनंद प्रतिनिधी डॉ.रोहित जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सांगोला मेडिकल असोसिएशन डॉक्टरांसाठी काम करत करत सर्व समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने मधून डॉक्टरांमध्ये व समाजामध्ये खेळ- व्यायाम यांच्या प्रती जागृती निर्माण व्हावी, यासाठी स्पोर्ट कमिटी तयार करण्यात आली, यामध्ये डॉ. उदय जाधव, डॉ. सुनील नारनवर ,डॉ. महावीर आलदर डॉ. रोहन जांगळे,डॉ अमृता लिगाडे, लिगल ॲडव्हायझर डॉ. स्नेहल भोसले, डॉ. सचिन बनसोडे यांची निवड करण्यात आली तर एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये डॉ. विजय बंडगर ,डॉ.राजेंद्र जानकर ,डॉ. धनंजय गावडे, डॉ.पीयूष पाटील ,डॉक्टर रमेश सिद. यांची निवड करण्यात आली.