सांगोला ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या प्रतिअसंवेदनशील;प्रभा" /> सांगोला ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या प्रति असंवेदनशील;प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करावे, नागरिकांची मागणी
IMG-LOGO
Home आरोग्य सांगोला ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या प्रति असंवेदनशील;प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करावे, नागरिकांची मागणी
आरोग्य

सांगोला ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या प्रति असंवेदनशील;प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करावे, नागरिकांची मागणी

November 2022 644 Views 0 Comment
IMG

सांगोला ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या प्रतिअसंवेदनशील;प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करावे, नागरिकांची मागणी

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाचा आरोग्याचे सूत्र संकल्प निरोगी महाराष्ट्राचा असा आहे.त्याच बरोबर आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्याप्रति शासन गंभीर असले तरी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम फुले मात्र उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांवर तातडीने उपचार करण्यास डॉ. उत्तम फुले यांनी दिरंगाई केल्याने जखमींना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी आणल्यानंतर तब्बल एक तासानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम फुले हे रुग्णालयात आल्याने त्यांची रुग्णांबाबत असलेली संवेदनशून्यता स्पष्ट झाली. डॉ. उत्तम फुले हे रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा रुग्ण रेफर करण्यावर भर देत असल्याने डॉ.फुले यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले काय कारवाई करणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

       सांगोला ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातून रुग्ण येत असतात. मात्र, ग्रामीण रुग्णालयाचेवैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले हे रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने गोरगरीब रुग्णांना कोणी वाली उरला नसल्याची स्थिती आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉ.फुले यांचा मनमानी कारभार सुरू असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये रेफर करण्याचे एकमेव काम ते करत आहेत. सोमवारी सायंकाळी वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातात सात वारकऱ्यांना जीव गमवावा लागला तर पाच वारकरी गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले हे गैरहजर असल्याने रुग्णांवर उपचार करण्यास विलंब झाला. डॉ. फुले हे रुग्णालयात येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने अखेर जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे जनतेच्या भावना समजून जिल्हा शल्यचिकित्सकांनी या बाबतीत निर्णय घेऊन डॉ. फुले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. 

       सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधीक्षक उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यावर एकीकडे शासन प्रयत्नशील असताना सांगोला ग्रामीण रुग्णालय फक्त नावालाच उरल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्व काही उपकरणे सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधीक्षकांना रेफरचा रोग जडला आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा ग्रामीण रुग्णालयात मिळत नाहीत. अतिमहागडी वैद्यक साधनसामग्री असतानाही वैद्यकीय अधीक्षकांच्या संवेदनशून्य कारभारा लमुळे ग्रामीण रुग्णालय मृत्यूचे केंद्र बनले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले हे ग्रामीण रुग्णालयात थांबत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आल्याने डॉ. फुले यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे.