सांगोला प्रतिनिधी
सांगोला वेल्फेअर असोसिएशन संचलित स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे सुपर स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी पार पडले. यावेळी कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टरांचा सत्कार स्पंदन हॉस्पिटल कडून करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ पियूष पाटील यांनी केले
या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की गेली दीड वर्ष आम्ही हॉस्पिटल चालवत असताना लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला व या संपूर्ण मानसिकतेचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की सांगोला तालुक्यांमध्ये स्पेशालिटी डॉक्टरांची संख्या बऱ्यापैकी आहे परंतु या सर्व सुविधा एकाच छताखाली व लोकांना परवडेल अश्या दरात व त्याचबरोबर पुढील उपचारासाठी लागणारे सुपर स्पेशलिटी डॉक्टर आपल्या सांगोलयात कसे येतील याचा विचार करून स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चा जन्म झाला. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जनतेला अतिशय उत्तम दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा असणार आहे.
यावेळी बोलताना डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सांगितले पूर्वीच्या काळी सांगोल तालुक्यामध्ये उपचाराअभावी बरेच पेशंट दगावले आहेत.परंतु स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून आता कोणत्याही पेशंटला जास्तीत जास्त लवकर व योग्य उपचार मिळण्याची सुविधा स्पंदन येथे उपलब्ध झालेली आहे.
त्यानंतर लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. संजय देशमुख यांनी स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सर्व कन्सल्टंट तर उपलब्ध आहेतच ,त्याच बरोबर लाईफ लाईन हॉस्पिटलचे सर्व सुपर स्पेशलिटी डॉक्टर सुद्धा येथे प्रत्येक आठवड्याला येऊन विजिट देणार आहेत हेच वेगळेपण स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे असणार आहे. त्याच बरोबर त्यांनी भविष्यामध्ये स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई, पुणे, सोलापूर व पंढरपूर सारख्या मोठ्या मोठ्या सर्जरी येथे होण्यास काही अडचण स्पंदन मध्ये येणार नाही असे सांगितले मी व माझी टीम या हॉस्पिटल ला सर्वतोपरी व पाहिजे ते सर्व सहकार्य करून जास्तीत जास्त पेशंटला सेवा देण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले.
यावेळी डॉ. श्रीकांत भोसेकर यांनी पूर्वीच्या प्रॅक्टिस मध्ये व आत्ताच्या प्रॅक्टिस मध्ये काय फरक आहे हे सांगितले. आम्ही सांगितले पहिल्यांदा पेशंटला क्लीनिकली बघत होतो आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की एमआरआय, सिटी स्कॅन,सोनोग्राफी या गोष्टी डायग्नोस्टिक साठी वापरून आता लवकरात लवकर निदान करणे शक्य झाले आहे.आत्ताच्या काळामध्ये डॉक्टर पेक्षा पेशंटला जास्त गडबड झालेली असते ते स्वतःहुनच या टेस्ट करू का त्या टेस्ट करून असे बोलत असल्यामुळे डॉक्टरांचा नाईलाज होतो व स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुळे आता सांगोला तालुका हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणखी नाव उज्ज्वल करेल अशी अपेक्षा व्यक्त करीत हॉस्पिटलच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरामध्ये हृदय रोग तज्ञ डॉ.कुलदीप कोलपाकवार ,मेंदू विकार मेंदू मनका शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. प्रविण वायकुळे व डॉ.देवदत्त पाटील ,मूत्ररोग तज्ञ डॉ.सचिन बोटे, त्याचबरोबर त्वचारोग तज्ञ डॉ.प्रियंका दोडके व डॉ. शैलेश डोंबे डॉ.अजिंक्य नष्टे हे उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण 310 पेशंटची मोफत तपासणी करण्यात आली,त्यापैकी 126 पेशंटचे मोफत ईसीजी,200 पेशंटचे मोफत शुगर तपासणी करण्यात आली, त्याच बरोबर ज्या पेशंटला सिटीस्कॅन व एम आर आय ची तपासणी करण्यास सांगितले आहे त्या पेशंटला सांगोला स्कॅन सेंटर व शार्दुल डायग्नोस्टिक सेंटर पंढरपूर येथे एकूण बिलामध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याच बरोबर 127 पेशंटचे सवलतीच्या दरामध्ये रक्त तपासण्य करण्यात आल्या व त्याचबरोबर हाडांची ठिसुळता तपासणी 96 पेशंटची करण्यात आली.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉ. संजीवनी केळकर, श्री तात्यासाहेब केदार, श्री जांगळे बापू, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, डॉ नेहा पाटील इत्यादी मान्यवरांनी घेऊन भेटी देऊन शिबिराची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे आभार सांगोला वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर माळी यांनी मानले.
यावेळी डॉ. सचिन गवळी,डॉ. संदीप देवकते डॉ.मेघना देवकाते डॉ.प्रदीप साळुंखे पाटील ,डॉ रामचंद्र जांगळे,डॉ निलेश इंगोले,डॉ महेशकुमार लिगाडे,डॉ. प्रसाद बुरांडे,डॉ. प्रफुल्ल बाबर, डॉ. राजेंद्र कुंभार ,डॉ.किरण जगताप, डॉ.सैफुन तांबोळी,डॉ.राहुल इंगोले डॉ. वैभव जांगळे ,विनायक लोखंडे डॉ.प्रवीण कसबे,डॉ. अक्षय कांबळे हे उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ योगेश बाबर यांनी केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल चा सर्व स्टाफ ,निदान पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी परिश्रम घेतले.