अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ९९७१ रुपयांचा गुटखा जप्त" />
सांगोला (तालुका प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या सांगोला शहरातील पान टपऱ्यांवर कारवाई करून ९ हजार ९७१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला शहरातील पाच पान टपरी चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्ती विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला शहरातील पान टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. गुरुवारी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी सांगोला शहरातील पान टपऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धनगर गल्ली येथील दोन ,सनगर गल्ली येथील तीन असे एकूण पाच जनाकडून ९ हजार ९७१ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी वरील सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच सदरील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे पुरवठादार कोण आहेत ? सदरचा प्रतिबंधित पदार्थ कोठुन विकत आणला ? याबाबत सविस्तर चौकशी तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.