पंचावन्न वर्षानी पुन्हा अनुभवले बालपण..
सांगोला/ प्रतिनिधी
बालपणीचा काळ सुखाचा असे जे म्हटले जाते,ते काही खोटे नाहो...तारुण्यातील उमेदीनंतर व सेवानिवृत्तीनंतर बालपण आठवू लागते...शाळेतील मित्र,मैत्रिणीची आठवण होते..गुरूजींचा मार आठवतो,शिक्षा आठवतात.वर्गात केलेल्या खोड्या आठवतात...हे क्षण पुन्हा नव्याने अनुभावावे वाटतात..त्यामूळे सेवानिवृत्ती नंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांचे व शाळेतील मित्रांचे मेळावे नव्या उत्साहाने होवू लागले आहेत...सांगोला तालुक्यातील सर्वात जुनी असलेल्या व अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील माजी विद्यार्थी दरवर्षी मित्र समेलने आयोजित करत आहेत..काल मंगळवारी एस.एस.सी.1970 सालचे विद्यार्थी या मित्र समेलनाच्या निमित्ताने 55 वर्षानी एकत्र भेटले...त्यावेळी तुच का तो...तुच का ती...असे विचारुन ओळख पटवावी लागत होती..बर्याच मित्रांची नावे विसरली होती,चेहरे बदलले होते..मात्र मित्रभेटीचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसून येत होता..सांगोला शहरातील चिंचोली बायपास रोड वरील होटेल श्रीराम ( नविन ) या ठिकाणी सदर मित्र समेलन संपन्न झाले..प्रारंभी ज्ञानदीप विद्यालय,सांगोला चे मार्गदर्शक इंजि.बाळासाहेब पाटील यांच्या विनंतीवरुन सर्व मित्रानी विद्यालयास भेट दिली..तेथून सर्व मित्र व मैत्रिणीनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत जावुन गुरुवर्य कै.बापुसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित केला..त्यानंतर सर्वजण कार्यक्रम ठिकाणी मार्गस्थ झाले..प्रारंभी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली...कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी मार्गदर्शन करताना विद्यामंदिरच्या प्रगतीचा व वाटंचालिचा आलेख मांडला...ज्येष्ठ नागरिकांनी संसारातून विरक्ती घेवून सूत्रे नविन पिढीच्या ताब्यात दिली तर मानसिक सौख्य.लाभते असे मत महादेव झिरपे सर यानी व्यक्त केले...गुरुवर्य दिगंबर जगताप व चंद्रशेखर अंकलगी यानी मनोगत व्यक्त केले...सर्व गुरुजनांचा शाल,बुके,सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देवुन सन्मान करण्यात आला...सांगोला शहरातील मित्रसमेलनाचे आयोजक प्रा.राजाभाऊ ठोंबरे यानी सांगोला शहरातील आज पर्यंत त्यानी आयिजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मित्रसमेलनाचा आढावा घेतला...प्रत्येक विद्यार्थी मित्र व मैत्रिणी यानी स्वयं परिचय करुन दिला...कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विनोद,काव्यवाचन,कथाकथन यामुळे रंगत वाढली..महादेव घोंगडे यानी कथाकथन तर मंगल कुरकुटे व सिद्धेश्वर झाडबुके यानी काव्यवाचन केले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यानी परिश्रम घेतले..प्रास्ताविक मित्रसमेलन प्रमुख इंजि.बाळासाहेब पाटील यानी केले..
सदर 1970 च्या बॅचचे गेट - टुगेदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन श्री हर्षप्रतिक पाटील व श्री महंमदगौस मुजावर सर यांच्या नेतृत्वाखाली सुंदर संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हिप्परकर आर पी सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम,श्रीमती सावंत मॅडम श्री सुरवसे सर, श्री माने सर, श्री गायकवाड सर शिक्षकेतर कर्मचारी श्री तानाजी श्रीराम श्री पवन खाडे,श्री सिद्धेश्वर घोरपडे,श्री पोपट शिंदे यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री मनोज जांगळे सर सेवानिवृत्त बैंक इन्स्पेक्टर सुकदेव ऊर्फ बापू जांगळे यानी आभार प्रदर्शन केले..या समेलनास पन्नासहुन अधिक मित्र- मैत्रिणी उपस्थित होते..पुढील मित्रसमेलनास याही पेक्षा अधिक संख्येने भेटण्याचा संकल्प करुन जड अंतकरणानी एकमेकांचा निरोप घेतला...