बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची " /> बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२3 मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, एकूण ७५ रुग्णवाहिका आषाढी वारी साठी सज्ज.
IMG-LOGO
Home सामाजिक बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२3 मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, एकूण ७५ रुग्णवाहिका आषाढी वारी साठी सज्ज.
सामाजिक

बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२3 मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, एकूण ७५ रुग्णवाहिका आषाढी वारी साठी सज्ज.

June 2023 315 Views 0 Comment
IMG

बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ ची आषाढी वारी २०२3 मध्ये तातडीची वैद्यकीय सेवा, एकूण ७५ रुग्णवाहिका आषाढी वारी साठी सज्ज.
                                                                                                                                                                                                                                                                                  पंढरपूर प्रतिनिधी      आषाढी वारी मध्ये बी व्हि जी द्वारे केलेले उल्लेखनीय कार्य सांगतांना आनंद होत आहे. आमच्या बिव्हीजी चे चेअरमन हनुमंत गायकवाड आणि बी व्ही जी चे डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बि व्ही जी नेहमीच मानवतेची सेवा करण्याचे आणि गंभीर आपत्तींचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून दाखवले आहे. डॉ. दीपक कुमार उके यांच्या मार्गदर्शनाने आषाढी वारीच्या काळात रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली .
विभागीय व्यवस्थापक श्री. विठ्ठल बोडखे आणि जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियंक जवाळे, श्री. राजेंद्र कदम आणि डॉ. अनिल काळे यांनी आषाढी वारी च्या काळात रुग्णांची प्राण वाचवण्याचे महत्वाचे योगदान दिले आहे. आपल्या आषाढी वारी 2023 साठी बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांनी आषाढी वारी २०२३ करिता जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे स्वतंत्र नियोजन केले आहे
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आषाढी वारी २०२३ मध्ये बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांच्या ७५ रुग्णवाहिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा , संत सोपान महाराज पालखी सोहळा , या पालखी सोहळ्याच्या प्रस्तानापासून तर पंढरपूर पर्यंत व पंढरपूर मध्येही डायल १०८ सुविधेचा उपयोग वारकऱ्यांना घेता येईल.पालखी सोबत व पालखी मार्ग मध्ये ठिकठिकाणी डायल १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुठल्याही आपात्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भावयास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तात्काळ रुग्णवाहिका वारकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल.
वारकऱ्यांना रुग्णवाहिका सेवा त्वरीत उपलब्ध व्हावी म्हणून बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांनी आषाढी वारी २०२३ करिता जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे स्वतंत्र नियोजन केले आहे. एकूण ७५ रुग्णवाहिका (२२ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट व ५३ बेसिक लाईफ सपोर्ट)
पुणे जिल्हा एकूण ५३ रुग्णवाहिका (१४ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट ३९ बेसिक लाईफ सपोर्ट)
सातारा जिल्हा एकूण ६ रुग्णवाहिका (१ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट व ५ बेसिक लाईफ सपोर्ट)
सोलापूर जिल्हा एकूण १६ रुग्णवाहिका ( ७ ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट व ९ बेसिक लाईफ सपोर्ट)
पंढरपूर शहर मध्ये २९ जुलै २०२३ आषाढी एकादशीला ला सुद्धा १५ स्वतंत्र रुग्णवाहिकेचे नियोजन केले आहे ह्या रुग्णवाहिका आषाढी एकादशीच्या आधीपासून उपलब्ध करून देण्यात येतील.
डायल १०८ ची सेवा प्रभावी पने देता यावी म्हणून पंढरपूर मध्ये डायल १०८ चे नियंत्रण कक्ष शुरू करयात येणार आहे व हे नियंत्रण कक्ष तेथील ई.ओ.सी (Emergency Operating Centre) शी समन्वय साधून सेवा प्रभावी पने देतील. बी. व्ही. जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ च्या माध्यमातून २०१४ पासुन २०२२ पर्यंत वर्षनिहाय अतिजोखामिच्या एकूण ४५२९ रुग्णांना डायल १०८ ची सेवा देऊन जीवनदान मिळाले. तसेच २६१६३० रुग्णांना जागेवर उपचार देण्यात आले आहेत.