जैवविविधतेला चालना देण्यासाठी सेंद्रिय द्राक्ष शेती फायदेशी" />
सांगोला (तालुका प्रतिनिधी): गेल्या तीन वर्षापासून शेतीमध्ये जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीच्या खते औषधांचा वापर करून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी द्राक्ष शेतीत क्रांती केली आहे. त्यांनी आपल्या शेतामधील ऊस, द्राक्ष व डाळिंब या फळबागांनाही ऑरगॅनिक्स स्वरूपातील खते औषधांचा वापर केला आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्धार बाळगून त्यांनी आपली सर्व शेती सेंद्रियशेती समृद्ध शेती कशी होईल याकडे लक्ष दिल्याने त्यांना चांगला फायदाही झाला आहे. जैवविविधतेला चालना देण्यासाठी सेंद्रिय द्राक्ष शेती फायदेशीर असल्याचे मत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.
द्राक्षासाठी योग्य माती निवडणे आवश्यक असून चांगली निचरा असलेली आणि सेंद्रिय घटकांनी समृद्ध असावी. सेंद्रिय खतांचा वापर करणे, कंपोस्ट खत, गांडूळ खत.आणि पालापाचोळा खत. तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा करण्यासाठी पालापाचोळ्याने माती झाकणे, तणनाशकांचा वापर करावा. कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक कीटकनाशकांचा व नीम तेलाचा वापर करावा. कीड नियंत्रणासाठी उपयुक्त असलेल्या वनस्पतींची लागवड करावी. शेतीचे सिंचन योग्य पद्धतीने करावे. द्राक्ष वेलींची योग्य छाटणी करावी. फवारणीसाठी नैसर्गिक उपाय वापरणे. सिलिकॉन स्प्रे वापरल्याने वनस्पतींचा ताण कमी होतो आणि बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.
सेंद्रिय पद्धतीने द्राक्षे पिकवणे हे एक आव्हानात्मक काम असले तरी, योग्य तंत्र आणि व्यवस्थापन पद्धतींनी हानिकारक रसायनांचा वापर न करता द्राक्षे तयार करता येतात. सेंद्रिय द्राक्ष शेती म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने द्राक्ष उत्पादन करण्यावर भर द्यावा. शेणखत, कंपोस्ट खत आणि इतर नैसर्गिक खतांचा वापर करून कीड आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय वापरावेत. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनांचा वापर करून केलेली शेती असून यामुळे मातीची सेंद्रिय रचना टिकवून ठेवणे, जैवविविधतेला चालना देणे, मातीचा ऱ्हास कमी करणे, पाण्याचे प्रदूषण कमी करणे फायद्याचे होत असल्याचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. सेंद्रिय द्राक्ष बाग यशस्वी होण्यासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे भाऊ यशवंत सावंत, कंपनीचे कार्यकारी संचालक विजयकुमार इंगवले, मार्गदर्शक गोरख ननवरे व राहुल जानकर तसेच शब्बीर शेख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.