स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्याने तालुक्यात" />
सांगोला /प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, वाकी( शिवणे), शिवणे, एखतपुर ,सांगोला, कमलापूर या गावांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नुकतीच पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये नव्याने तालुक्यातील सहा गावांचा समावेश करून या गावातील शेतीसाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहेत. अशी माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील नव्याने सहा गावे समाविष्ट केलेली आहेत . यामध्ये नरळेवाडी, वाकी( शिवणे), शिवणे, एखतपूर, सांगोला, कमलापूर या गावांचा समावेश आहे. यामुळे या गावातील शेतीला कायमस्वरूपी हक्काचे पाणी मिळणार असल्याने या गावातील शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांची शेतीसाठी असलेली पाण्याची मागणी पूर्ण होत आहे. भविष्यात या गावातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.