सांगोला विद्यामंदिरमध्ये स्थानिक भूजल समस्या व व्यवस्थापनसं" />
सांगोला ( प्रतिनिधी) भारत सरकार जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा नदी विकास व गंगा पुनरूज्जीवन विभाग केंद्रीय भूजल मंडळ नागपूर यांचेकडून माझा युवा भारत कार्यक्रम अंतर्गत एक दिवस प्रशिक्षण कार्यक्रमात स्थानिक भूजल समस्या व भूजल व्यवस्थापन याविषयी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षण उद्घाटन समारंभामध्ये व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, वरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ जी. एस.लोंढे, वरिष्ठ भू भौतिक शास्त्रज्ञ एस.एस.पुरती, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,प्रशिक्षण व्याख्याते भूजल शास्त्रज्ञ अमरनाथ, उज्ज्वलकुमार,दिलीपकुमार मीना उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपण सर्व शेती संस्कृतीशी निगडित आहे.त्यामुळे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय पाणी यासंदर्भात जलशक्ती मंत्रालय भारत सरकारकडून सांगोला विद्यामंदिरची निवड करून यासंदर्भात भूजल समस्या व भूजल व्यवस्थापन याविषयी प्रशिक्षणामध्ये मिळणारे अनमोल मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे असे सांगत प्रशिक्षण विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण केली व आयोजकांचे कौतुक केले. प्राचार्य अमोल गायकवाड यांनी पाणी प्रश्न महत्त्वाचा असून या प्रशिक्षणातून यासंबंधीचे विचार विद्यार्थी आत्मसात करून आपल्या कुटुंबीयांमध्ये व गावामध्ये मांडतील व त्यातून या प्रशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला
त्यानंतर प्रशिक्षणामध्ये व्याख्याते भूजल शास्त्रज्ञ उज्ज्वलकुमार यांनी बेसीक हायड्रोजियोलॉजी, भूजल शास्त्रज्ञ अमरनाथ यांनी सांगोला तालुक्यातील जल उपलब्धता, व्यवस्थापन आणि संवर्धनाची जलविज्ञान स्थिती व महाराष्ट्र जलव्यवस्थापन मॉनिटरिंग हायड्रोलॉजी व भू भौतिक शास्त्रज्ञ दिलीपकुमार यांनी एक्सप्लोरेशनमधील जिओफिजिकल सर्वेक्षण या संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ,भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत सिंगारेन एस पूर्ती यांनी केले तर सूत्रसंचालन अमरनाथ व प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.