मेहनत केल्यावर फळ हे निश्चित मिळते:-वनपरिक्षेत्र अधिकारी श्री." /> मेहनत केल्यावर फळ हे निश्चित मिळते -वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम जाधवर
IMG-LOGO
Home सामाजिक मेहनत केल्यावर फळ हे निश्चित मिळते -वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम जाधवर
सामाजिक

मेहनत केल्यावर फळ हे निश्चित मिळते -वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम जाधवर

December 2024 244 Views 0 Comment
IMG

मेहनत केल्यावर फळ हे निश्चित मिळते:-वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम जाधवर.

 

सांगोला प्रतिनिधी 

मेहनत केल्यानंतर त्याच फळ आपल्याला निश्चित मिळते असे प्रतिपादन तुकाराम जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले. सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या फुडस्टॉल, फनीगेम्स, कला व विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दि.18 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 या दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन होणार असून काल पहिल्या दिवशी कला, विज्ञान,फुडस्टॉल व फनीगेम्सने या कार्यक्रमांची सुरूवात झाली.

            पुढे बोलताना जाधवर यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे. आई-वडिलांचा गुरूजनांचा आदर केला पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात तयार केलेल्या वस्तूंबद्दल कौतुक केले. तसेच इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना रोख रुपये 400 बक्षीस देखील दिले. 

          त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल कमी वापरावा तसेच यासंदर्भात पालकांनी दक्ष राहणे महत्त्वाचे आहे असे सांगून आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करावा, परिश्रम घ्यावे असे सांगितले. 

         तसेच सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी मैदानी खेळ खेळावेत असे सांगत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

         यावेळी संस्था सचिव श्री. म. शं. घोंगडे हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शिल्पा ढाळे, प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सविता देशमाने, कार्यक्रम प्रमुख सुकेशनी नागटिळक, इंग्लिश मेडिअमच्या स्नेहसंमेलन प्रमुख सायली आंडगे, मराठी माध्यमाचे स्नेहसंमेलन प्रमुख चेतन कोवाळे, इंग्लिश मेडिअम मधील विद्यार्थी प्रतिनिधी अरमान सुतार, विद्यार्थीनी प्रतिनिधी पूर्वा चव्हाण तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी वरद म्हमाणे, विद्यार्थ्यीनी प्रतिनिधी अनुश्री तेली इ.उपस्थित होते. 

         कालच्याच्या कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व सांस्कृतिक दर्शन या सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

         सदर कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही माध्यमाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कला प्रदर्शनासाठी कु.भाग्यश्री पांचाळ, कु.प्रतिभा मस्तुद यांनी तर विज्ञान प्रदर्शनासाठी यतिराज सुरवसे, उत्तम बेहेरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिल ढोले-पाटील यांनी केले तर संगमेश्वर घोंगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

 आज सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिरचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सकाळी 11 ते 5 या वेळेत आयोजित केली असल्याची माहिती प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी दिली.