स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी (घे.) ग्रामपंचायतीच" /> स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी ( घे) ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न
IMG-LOGO
Home सामाजिक स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी ( घे) ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न
सामाजिक

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी ( घे) ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न

February 2024 79 Views 0 Comment
IMG

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी (घे.) ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर संपन्न... 

सांगोला प्रतिनिधी.

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वाकी घे. ग्रामपंचायतींच्या वतीने शनिवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले. यावेळी स्पंदन चे अध्यक्ष डॉ पियुष साळुंखे पाटील हे बोलताना म्हणाले पूर्वी सांगली, पंढरपूर ,सोलापूर येथे रुग्ण जाण्याचे प्रमाण जास्त होते ,इमर्जन्सी मध्ये तिथे पर्यंत पोहचणे अतिशय जिकिरीचे होवून जायचे यामध्ये रुग्ण जगण्याचे प्रमाण फक्त दहा टक्के होते.परंतु स्पंदन हॉस्पिटल आणि येथे काम कारणारे आमचे सहकारी व मी 24 तास आपल्यासाठी सज्ज आहोत. कोणतेही पेशंट असू द्या आमच्या हॉस्पिटल मध्ये त्यावरील तज्ञ डॉक्टर उपचार करतात.

या वेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व स्पंदन हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ पियुष साळुंखे पाटील,डाॅ सचिन गवळी, फिजिशियन डॉ.अतुल बोराडे,डॉ. शैलेश डोंबे,डॉ.अजिंक्य नष्टे,बालरोग तज्ञ डॉ संदिप देवकते,स्त्री रोग तज्ञ डॉ नेहा साळुंखे पाटील डॉ मेघना देवकते, सर्जन डॉ.सौरभ अजळकर, स्पंदन चे संचालक डॉ.निलेश इंगवले,डॉ महेश लिगाडे ,डॉ वैभव जांगळे ,डॉ योगेश बाबर, घेरडी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ खांदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन सरपंच अर्चना शिंदे,उपसरपंच रमेश कांबळे,जेष्ठ नेते दादासाहेब देवकते, प्राचार्य बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

        या वेळी डॉ योगेश बाबर यांनी स्पंदन हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा व हॉस्पिटल च्या कामाची माहिती सांगितली. जेष्ठ नेते दादासाहेब देवकते यांनी गावाविषयी माहिती व उपस्थित सर्व डॉक्टर आणि ग्रामस्थांचे आभार मानून जास्तीत जास्त लोकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.प्राचार्य बाळासाहेब शिंदे सर यांनी सर्व रोग निदान शिबिराची आवश्यकता आणि गावातील लोकांमध्ये आरोग्याविषीची जनजागृती हा उद्देश सर्वांसमोर स्पष्ट केला. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डाॅ नेहा साळुंखे पाटील व डॉ मेघना देवकते यांनी स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याविषयी कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन केले.सरपंच अर्चना शिंदे यांनी आजपर्यंत गावांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली.

या वेळी प्रमुख मान्यवर व पदाधिकारी यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य संजय लवटे, अजय कांबळे, छाया खांडेकर, सोनाली खांडेकर ,जयश्री चोपडे ,मनिषा निमंग्रे ,अंजना कोळेकर ,वाघ भाऊसाहेब ,ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण पवार, मनोहर पवार ,शाहरुख खान, संयोजक डॉ पुण्यवंत निमंग्रे, डॉ विनायक उत्तरे, पोलिस पाटील हलिमसो पाटील, जिल्हा सचिव तुकाराम घेरडे सरकार, युवा नेते रफीक शेख, याशीन पठाण, कैयुम शेख, बापुराव वाघमारे, बाळासाहेब वळकुंदे, समाधान शिंदे, प्रकाश निमंग्रे, बाळु झिंजुरटे, संतोष चने ,वगरे सावकर ,इकबाल पटेल, अंकुश निमंग्रे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला 

या सर्व रोग शिबिर मध्ये १९८ नागरीकांची डोळे तपासणी, ११८ नागरीकांना चष्मा वाटप, सी.बी.सी तपासणी ४५ ,औषध वाटप ११०, पुरुष व महिला सर्व रोग तपासणी १३५, जेष्ठ नागरिक यांना काठी वाटप २०, इत्यादी सुविधा देण्यात आली उपस्थित नागरिक, ग्रामस्थांना चहा ,नाश्ता व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती.या वेळी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. 

           नुतन जिल्हा सचिव म्हणून तुकाराम घेरडे सरकार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश कांबळे यांनी मानले.