स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमि" /> स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
IMG-LOGO
Home सामाजिक स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
सामाजिक

स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

January 2024 153 Views 0 Comment
IMG

स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन 

 

सांगोला प्रतिनिधी

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आलेल्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, शरीरातील ऑक्सिजनची तपासणी, साखरेची तपासणी, इसीजी, ब्लड प्रेशर व हाडाची ठिसूळ तपासणी केले जाणार आहे. या शिबिरातील ज्या रुग्णांना डॉक्टरांनी सांगितलेल्या रक्ताच्या चाचण्या सिटी स्कॅन, एम. आर .आय व औषध यावर सवलत देण्यात आलेली आहे. यामध्ये सिटीस्कॅन व एम आर आय मध्ये दहा टक्के सवलत सांगोला स्कॅन व एम आर आय सेंटर मध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्पंदन लॅब मध्ये रक्ताच्या तपासणीवर पंधरा टक्के सवलत व डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर स्पंदन मेडिकल मध्ये दहा टक्के सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या पेशंटला ऍडमिशन ची गरज आहे त्या पेशंट वरती हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.

या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या रुग्णांना ऑपरेशनची गरज भासल्यास अत्यल्प दरामध्ये ऑपरेशन ही केले जाणार आहे.यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी दहा हजार रुपये सिझेरियन पंचवीस हजार रुपये, गर्भाशयाची पिशवी काढणे पंचवीस हजार रुपये, हायड्रोसिल पंधरा हजार रुपये ,अपेंडिक्स, हर्निया वीस हजार रुपये, मूळव्याध, फिशर फिशचुला वीस हजार रुपये इतक्या अत्यल्प दरामध्ये ऑपरेशन केले जाणार आहे.या मध्ये मेडिकल व रक्त तपासण्या सवलतीच्या दरामध्ये केले जाणार आहे.

त्याचबरोबर स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सेवा ही उपलब्ध आहे.यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स,केअर हेल्थ इन्शुरन्स, टाटा एआयजी हेल्थ इन्शुरन्स व युनिव्हर्सल संपो. जनरल इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य सेवा देत आहेत.या इन्शुरन्स कंपन्या चे ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांच्यावर मोफत उपचार करणार आहेत.

 या शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ.पियुष साळुंखे पाटील व डॉ. सचिन गवळी, फिजिशियन मधुमेह व उच्च रक्तदाब तज्ञ डॉ. अतुल बोरुडे ,डॉ. शैलेश डोंबे व डॉ. अजिंक्य नस्थे, बालरोग तज्ञ डॉ. संदीप देवकते, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. नेहा साळुंखे पाटील व डॉ. मेघना देवकते सर्जन डॉ. सौरभ अजळकर व डॉ. सुधीर ढोबळे हे आलेल्या सर्व रुग्णावर मोफत उपचार करणार आहेत.

 त्याचबरोबर स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आठवड्याला त्वचारोग, हृदयरोग, मेंदू ,मनका उपचार तज्ञ भेट देत असतात व फिजिशियन, अस्थिरोग तज्ञ ,सर्जन, बालरोग तज्ञ ,स्त्री रोग तज्ञ हे 24 तास स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. सदर शिबिर हे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जुना मेडशिंगी रोड वाडेगाव नाका सांगोला येथे संपन्न होणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान स्पंदन हॉस्पिटल कडून करण्यात आले आहे.