सिताराम साखर कारखाना वजनाला चोख व बिलाला रोख - डॉ. राजलक्ष्मी कळ" /> सिताराम साखर कारखाना वजनाला चोख व बिलाला रोख - डॉ. राजलक्ष्मी कळुंगे गायकवाड
IMG-LOGO
Home सामाजिक सिताराम साखर कारखाना वजनाला चोख व बिलाला रोख - डॉ. राजलक्ष्मी कळुंगे गायकवाड
सामाजिक

सिताराम साखर कारखाना वजनाला चोख व बिलाला रोख - डॉ. राजलक्ष्मी कळुंगे गायकवाड

November 2023 226 Views 0 Comment
IMG

सिताराम साखर कारखाना वजनाला चोख व बिलाला रोख - डॉ. राजलक्ष्मी कळुंगे गायकवाड

सिताराम कारखान्याचा २७०० चा पहिला हप्ता जाहीर.


कार्तिकी एकादशी निमित्त ९१००० व्या साखर पोत्यचे पूजन


सांगोला प्रतिनिधी
सांगोला, पंढरपूर व मंगळवेढा या तिन्ही तालुक्यात मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेला खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना चालू गळीत हंगामात जोराने सुरू असून या हंगामामध्ये पहिल्या १ ते १० तारखेपर्यंत व ११ ते २० तारखेपर्यंत पहिल्या व दुसऱ्या १० दिवसाच्या मस्टर मधील गाळप झालेल्या उसाला २५०० रुपये प्रति टन ऊसाला दर दिलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना लवकरच २०० प्रति टन फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी कळूंगे गायकवाड यांनी दिली.
कार्तिक एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ९१हजार व्या साखर पोत्याचे पूजन करताना त्या बोलत होत्या. त्यावेळी सिताराम कारखान्याचे मुख्य प्रवर्तक काळुंगे सर यांनी सांगितले की ऊस दराची स्पर्धा पाहता व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सिताराम कारखान्याने ऊस दराचा पहिला हप्ता २७०० जाहीर केलेला आहे.या अतिशय स्पर्धेच्या वातावरणात शेतकरी बांधवांनी जो विश्वास सिताराम कारखान्यावर दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी व द्विगुणीत करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने ऊस दर प्रति टन इतर कारखान्याच्या बरोबरीने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज मितीला कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असून ३५०० मे.टन क्षमतेने उसाच्या गाळप करण्यात येत आहे.चालू गळीत हंगाम मध्ये ४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड यांनी सांगितले प्रत्येक दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.चालू वर्षी कारखान्याची विस्तारीकरण झाले असून यंदाही सर्वांच्या बरोबरीने दर देण्याची परंपरा कायम ठेवणार आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू असून चालू गळीत हंगामामध्ये चार लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने सर्व यंत्रणा नियोजन पद्धती त्या काम करीत आहेत. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे.त्याच पद्धतीने सिताराम महाराज कारखाना हा वजनाला चोख व बिलाला रोख आहे असे सांगितले.
सदर कार्यक्रमाला शिवाजीराव काळुंगे सर,डॉ. राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, संचालक रविराज गायकवाड, अविनाश चव्हाण, संजय चौगुले,जनरल मॅनेजर हनुमंत पाटील,मुख्य शेती अधिकारी पी जी शिंदे व उत्पादक शेतकरी उपस्थित होते